पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात १३ तालुक्यांत एकूण २३ हजार ११४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
बारामती तालुक्यात १ हजार ९४५, मावळ १ हजार ६१२, मुळशी १ हजार ४९५, शिरूर २ हजार १९०, हवेली १ हजार ८००, दौंड २ हजार ६०, इंदापूर २ हजार ६३२, पुरंदर १ हजार ५३८, भोर १ हजार १९०, वेल्हे ४५०, आंबेगाव १ हजार ५७५, जुन्नर २ हजार ४११ आणि खेड २ हजार २१६ तालुक्यात असे एकूण २३ हजार ११४ मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्रे
बारामती तालुक्यात २९९, मावळ २४३, मुळशी २२७, शिरूर ३३७, हवेली २६३, दौंड ३१७, इंदापूर ४००, पुरंदर २३५, भोर २३७, वेल्हे १०५, आंबेगाव २३९, जुन्नर ३६६ आणि खेड ३३७ तालुक्यात अशी एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ आदर्श व महिला मतदान केंद्रे आहेत.तक्रार निवारण कक्षाची स्थापना
निवडणुकीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी ०२०-२६१२३३७१ हेल्पलाईन क्रमांक तसेच १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.
Web Summary : Pune deploys 23,114 personnel across 13 talukas for Zilla Parishad elections. 3,605 polling stations set up, including model booths. A grievance redressal cell is active; citizens can call helpline numbers for assistance.
Web Summary : पुणे जिला परिषद चुनाव के लिए 13 तालुकाओं में 23,114 कर्मचारी तैनात। 3,605 मतदान केंद्र स्थापित, आदर्श बूथ भी शामिल। शिकायत निवारण कक्ष सक्रिय; नागरिक हेल्पलाइन नंबरों पर संपर्क कर सकते हैं।