ओतूर परिसरात मंगळवारी २३ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:11 IST2021-05-12T04:11:20+5:302021-05-12T04:11:20+5:30
ओतूर परिसरात मंगळवारी डिंगोरे २, आंबेगव्हाण ५, उदापूर ६, पाचघर ७, ओतूर, बल्लाळवाडी, तेजेवाडी प्रत्येक गावात एक एक ...

ओतूर परिसरात मंगळवारी २३ नवीन रुग्ण
ओतूर परिसरात मंगळवारी डिंगोरे २, आंबेगव्हाण ५, उदापूर ६, पाचघर ७, ओतूर, बल्लाळवाडी, तेजेवाडी प्रत्येक गावात एक एक नवीन असे एकूण २३ रुग्ण सापडले. त्यामुळे परिसरातील बाधितांची संख्या दोन हजार १७ झाली आहे. पैकी १ हजार ६४९ बरे झाले आहेत. २०६ कोविड सेंटर ८८ जण घरीच उपचार घेत आहेत, ७४ जणांचा मृत्यू झाला आहे असे डॉ. शेखरे म्हणाले.
डिंगोरे बाधितांची संख्या २०३ झाली आहे. १५९ बरे झाले आहेत. ३७ जण उपचार घेत आहेत. ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
आंबेगव्हाण येथील बाधितांची संख्या २५ झाली आहे. १४ बरे झाले आहेत, १० जण उपचार घेत आहेत, एकाचा मृत्यू झाला आहे.