हिंजवडीमधून लुटले युवकांकडील २३ लाख
By Admin | Updated: November 3, 2015 03:32 IST2015-11-03T03:32:09+5:302015-11-03T03:32:09+5:30
हिंजवडीत पुणे-बंगळुरू महामार्गावर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी दोघांना अडवून कोयत्याने जखमी करून त्यांच्याकडील

हिंजवडीमधून लुटले युवकांकडील २३ लाख
पिंपरी : हिंजवडीत पुणे-बंगळुरू महामार्गावर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी दोघांना अडवून कोयत्याने जखमी करून त्यांच्याकडील २३ लाख ९ हजार ३०१ रुपयांची रोख रक्कम लुटून नेली. हिंजवडी परिसरात रात्री लूटमारीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विलास नलावडे (वय २२, रा. पाषाण) दुचाकीवरून हिंजवडीमार्गे जात होते. दुचाकीवर पाठीमागे मित्र आशिष चक्रनारायण बसले होते. फिर्यादी काम करत असलेल्या एका खासगी कंपनीतून २३ लाख ९ हजार ३०१ रुपयांची रोख रक्कम घेऊन दुचाकीवरून ते पाषाणला घरी जात होते. रविवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी नलावडे आणि चक्रनारायण यांना अडवले. चक्रनारायण यांच्या डोक्यात कोयत्याने चोरट्यांनी वार केले. तसेच नलावडे यांच्या डोक्यात कोयता उलटा मारला. दोघांना जखमी करून त्यांच्याकडील
पैशांची पिशवी चोरट्यांनी
हिसका मारून पळवून नेली.
चोरटे मुंबईच्या दिशेने निघून गेले. हिंजवडी पोलिसांकडे अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्यादीने तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)