शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २३ दिवस उशिराने गोव्यासह राज्यातून मॉन्सून माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 14:46 IST

नैऋत्य मोसमी पावसाने गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले़. येत्या २४ तासात मॉन्सून संपूर्ण देशातून माघारी परण्याची शक्यता आहे़.

ठळक मुद्देसंपूर्ण देशातून येत्या २४ तासात मॉन्सून माघारी जाण्याचे संकेत२६ आॅक्टोबरपर्यंत द्वीपसमुहातूनही तो माघारी परतेल़ 

पुणे : नैऋत्य मोसमी पावसाने गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले़ सर्वसाधारणपणे दरवर्षी १ आॅक्टोबरला मॉन्सून राज्यातून माघारी जात असतो़ यंदा त्याला तब्बल २३ दिवस उशीर झाला आहे़ येत्या २४ तासात मॉन्सून संपूर्ण देशातून माघारी परण्याची शक्यता असून २६ आॅक्टोबरला तो द्वीपसमुहातूनही माघारी परण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे़ साधारण दरवर्षी मॉन्सूनच्या परतीस पश्चिम राजस्थानमधून १ सप्टेंबरच्या सुमारास सुरुवात होते़ यंदा मॉन्सूनला सर्वाधिक काळ रेंगाळला असून गेल्या ७ वर्षात सर्वात उशिरा मॉन्सूनची माघारी जाण्यास सुरुवात झाली होती़ मॉन्सूनची माघारी सुरु झाली हे जाहीर करताना हवामान विभाग काही निकष पडताळून पहाते़ त्यात सलग ५ दिवस त्या त्या क्षेत्रातील पावसाचे कमी होत गेलेले प्रमाण, हवेतील आर्द्रता कमी होत जाते़ त्यानंतर त्या भागातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असल्याचे समजले जाते़ गेल्या काही दिवसात राज्यात अपवाद वगळता पाऊस झाला नाही़ तसेच आर्द्रता कमी होत गेली असून उष्मा वाढला आहे़ मंगळवारी मॉन्सूनची माघारीची रेषा कलिंगापट्टम, मेडक, बिजापूर, गोवा अशी आहे़ येत्या २४ तासात मॉन्सूनचे संपूर्ण देशभरातून माघारी परतण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़  देशभरात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत ९५ टक्के पाऊस झाला असला तरी त्याचे वितरण असमान होते़ आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये कमी झालेल्या पावसामुळे हे असमान वितरण झाले असल्याचा निष्कर्ष हवामान विभागाने काढला आहे़ विशेषत: उत्तर भारतातील अनेक विभागात यंदा कमी पाऊस झाला आहे़ त्याचबरोबर विदर्भात सप्टेंबर अखेर सरासरीपेक्षा तब्बल २३ टक्के पाऊस कमी होता़ त्यानंतरही १ ते २३ आॅक्टोंबर दरम्यान विदर्भातील ५ जिल्ह्यात कमी पाऊस पडला आहे़ नांदेडमध्येही कमी पाऊस झाला आहे़  परतीचा पाऊसही माघारी गेल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील धरणातील पाणीसाठा कमी आहे़ त्यामुळे उन्हाळ्यात तेथे पाणी संकट उद्भवण्याची शक्यता आहे़  

टॅग्स :RainपाऊसPuneपुणेgoaगोवा