शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या 'या' निर्णयामुळे ‘छत्रपती साखर कारखान्याचा’ २१८ कोटी ५० लाखांचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 15:44 IST

महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या करोडो उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार

बारामती : अर्थसंकल्पात नुकतेच जाहिर झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सहकारी साखर उद्योगाच्या एफ.आर.पी. पेक्षा ज्यादा देण्यात येणारी रक्कम  बजावट करण्यास मान्यता दिली आहे. सहकारी साखर उद्योगाला फार मोठा दिलासा मिळालेला आहे. भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला या निर्णयामुळे २१८ कोटी ४८ लाख ९३ हजार ४१० रुपये फायदा झाल्याचे शेतकरी कृती समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले.

याबाबत जाचक म्हणाले, यापूर्वी म्हणजे सुमारे चाळीस वर्षांपासून किमान भावापेक्षा ज्यादा दिलेला ऊस दर हे करपात्र उत्पन्न धरले जात होते. त्यावर करोडो रुपयांचा आयकर भरण्याबाबत आदेश वेळोवेळी आयकर विभागाकडून येत होते. त्याला सर्व सहकारी उद्योगांनी एकजुटीने विरोध केला, न्यायालयीन प्रक्रीया राबविली मात्र यात यश येत नव्हते. वरील आयकरातील तरतूदीतून खाजगी साखर उद्योग मात्र वगळण्यात आला होता, ही विशेष बाब आहे. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना आयकर आकारायची सुरुवात ही श्री छत्रपती सहकारी कारखाना, दि. माळेगांव सहकारी साखर कारखाना  व प्रवरानगर येथील प्रवरा सहकारी साखर कारखाना या कारखान्यांपासून सुरुवात झाली होती.

नोव्हेंबर २०२२ बारामती येथे पार पडलेल्या सहकार परिषदेत अनेक मागण्यांपैकी ही एक प्रमुख मागणी होती. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री सितारामन यांनी सहानुभुतीपुर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची या अर्थसंकल्पात पुर्तता करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री अतूलजी सावे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आमदार राहूल कुल साहे यांनी यात विशेष लक्ष घातले. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे. त्याबद्दल त्यांचे करोडो ऊस उत्पादक सभासदांसाठी हा निर्णय महत्वाचा असल्याचे जाचक म्हणाले.

यापूवीर्ही सहकारी साखर कारखान्यांमध्ये विनापरतीच्या ठेवी घेण्यात येत असत. त्यासुद्धा करपात्र उत्पन्न म्हणून धरल्या गेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने सन २००२ मध्ये बाजू मांडली. या याचिकेचा निकाल सहकारी साखर कारखान्यांच्या बाजूने लागला होता. हे जाचक यांनी आवर्जुन नमुद केले आहे.

...हे तर सहकार परिषदेचे फलीत

केंद्र शासनाने नुकत्याच जाहिर केलेल्या अर्थसंकल्पात साखर कारखान्यांना मोठी सवलत दिली आहे. यामध्ये सहकारी साखर उद्योगाच्या ‘एफआरपी’ पेक्षा जादा देण्यात येणारी रक्कम वजावट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे बारामती येथे नोव्हेंबर २०२३ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सहकार परीषदेचे फलीत असल्याचे परिषदेचे निमंत्रक शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनSugar factoryसाखर कारखानेCentral Governmentकेंद्र सरकार