दौैंडला शेवटच्या दिवशी २१२३ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:12 IST2020-12-31T04:12:22+5:302020-12-31T04:12:22+5:30
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत अडीच तास वाढवून देण्यात आला होता. परिणामी साडे पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात ...

दौैंडला शेवटच्या दिवशी २१२३ अर्ज दाखल
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत अडीच तास वाढवून देण्यात आला होता. परिणामी साडे पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशीही एकही अर्ज आला नव्हता. दुसऱ्या दिवशी १३ अर्ज तिसऱ्या दिवशी १८७, चौैथ्या दिवशी ८२१, पाचव्या दिवशी ११४७ अर्ज दाखल करण्यात आल्याने एकूण अर्ज २१२३ दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान गटातटाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर नानगाव, पाटस, पिंपळगाव, राजेगाव, रावणगाव, सहजपूर, शिरापूर, वरंवड, वाळकी, यवत, खामगाव, कानगाव, भांडगाव, बोरीपार्धी, गलांडवाडी, गिरीम, लिंगाळी, मळद, खडकी, कुसेगाव, सोनवडी या ग्रामपंचायतीसाठी लक्षवेधी निवडणुका होतील आणि याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले राहिल.
सोशल डिस्टंनचा अभाव
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे समर्थक बहुतांशी लोकांनी सोशल डिस्टंनचा फज्जा उडवला होता. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र कक्ष वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने प्रत्येक कक्षाच्या परिसरात ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मात्र यावेळी सोशल डिस्टंन नव्हते.
दौंड येथील प्रशासकीय इमारतीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेली गर्दी. (छायाचित्र : मनोहर बोडखे)
३० दौंड