शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

शहरात निर्माण होतोय दररोज २१०० टन कचरा; मात्र ५१८ टन कचऱ्यावरच प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 04:27 IST

कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने पुणेकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

पुणे : शहरामध्ये दररोज तब्बल २००० ते २१०० टन कचरा गोळा होत असून, प्रक्रिया केवळ ५१८ टन कचºयावरच होत असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात समोर आली आहे. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने पुणेकरांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे. अनेक आजारांना यामुळे निमंत्रण दिले जात असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले.नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमुळे दररोज निर्माण होणाºया कचºयामध्येदेखील वाढ झाली आहे. सध्या शहरामध्ये दररोज तब्बल २००० ते २१०० टन इतका प्रचंड कचरा निर्माण होतो. यामध्ये ई-कचरा, जैववैद्यकीय कचरा अशा विविध प्रकारच्या कचºयाचा समावेश आहे. यात पालखी, दिवाळी, दसरा अशा विविध सण-समारंभादरम्यान दररोज कचºयामध्ये २०० ते ३०० टनाने वाढ होते. याशिवाय १५० ते १८० टन बांधकाम क्षेत्रातील, ५० ते ६० टन गार्डन वेस्ट आणि ५ ते ६ टन जैववैद्यकीय कचरा निर्माण होतो.महापालिकेच्या वतीने कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यासाठी शहरात विविध ठिकाणी अनेक लहान-मोठे कचरा प्रक्रिया प्रकल्प देखील उभारण्यात आले. परंतु यातील ५० टक्क्यांहून अधिक प्रकल्प हे नेहमीच विविध कारणांनी बंद असतात. त्यामुळे शहरात दररोज २ हजार टनपेक्षा कचरा निर्माण होत असताना प्रक्रिया केवळ ५१८ टन कचºयावर होते. दरम्यान, शहरात निर्माण होणाºया कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून खासगी संस्थेला हे काम करण्यात आले आहे. परंतु शहरात केवळ ६३ टक्केच कचºयाचे वर्गीकरण होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.जैववैद्यकीय ५० टक्केच कचºयावर प्रक्रियाशहरातील सुमारे ४०० ठिकाणांहून विविध हॉस्पिटल, दवाखान्यांमधून जैववैद्यकीय कचरा गोळा केला जातो. शहरामध्ये दररोज सुमारे ६ टनपेक्षा अधिक जैववैद्यकीय कचरा गोळा होतो. परंतु यापैकी सध्या केवळ ३ टन कचºयावर प्रक्रिया होत असल्याचे महापालिकेच्याच पर्यावरण अहवालात म्हटले आहे. जैववैद्यकीय कचरा पर्यावरण आणि मानवासाठी हानिकारक असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले.शहरात वर्षाला १० हजार टन ई-वेस्टआयटी शहर म्हणून ओळख निर्माण केलेल्या पुण्यात इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा ‘ई-वेस्ट’ कचºयाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यात दरवर्षी तब्बल १० हजार टन हा ई-वेस्ट निर्माण होत असून, या कचºयाची विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या सध्या महापालिकेच्या समोर आहे. कचºयाची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लागल्याने मोठ्या प्रमाणात साथीचे व जीवघेण्या आजारांचे रोगजंतू पसरू शकतात. तसेच काही भागांत यामुळे पाण्याचे स्रोतदेखील दूषित होत असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नPuneपुणे