शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

पुण्यात मुदत संपल्यानंतर आली २१० गणेश मंडळांना जाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 19:21 IST

मंडप टाकणे, कमानी उभारणे, देखावे तयार करण्यासाठी गणेश मंडळांची लगबग सुरू आहे.

ठळक मुद्देमंडप, कमानी घालण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी धावपळ

पुणे : न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका अधिकारी, पोलिस प्रशासनांने वेळोवेळी गणेश मंडळांना मंडप, कमांनी उभारण्यासाठी परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या वतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पध्दतीने अर्ज घेण्यासाठी खास यंत्रणा निर्माण केली. परंतु, त्यानंतर देखील शहरातील तब्बल २०० हून अधिक गणेश मंडळांनी मंडप, कमांनीसाठी परवानगी घेतलेली नाही. आता या गणेश मंडळांना जाग आली असून, परवानगी मिळविण्यासाठी धावपळ सुरु केली आहे.                पुण्यासह संपूर्ण राज्यात येत्या २ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. यासाठी मंडप टाकणे, कमानी उभारणे, देखावे तयार करण्यासाठी गणेश मंडळांची लगबग सुरू आहे. न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेबाबत निर्णय देताना न्यायालयाने सर्व गणेश मंडळांना मंडप, कमांनी उभारण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. गतवर्षीपासून अशाप्रकारे परवानगी न घेणा-या मंडळांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक स्थापन करण्यात येत असून, या पथकामार्फत प्रत्येक मंडळांची तपासणी करण्यात येते. महापालिकेच्या वतीने यंदा सर्व गणेश मंडळांना मंडप, कमानीसाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्यास २० ऑगस्ट ही अंतिम मुदत होती. या मुदतीमध्ये शहरातील केवळ १ हजार ९९६ गणेश मंडळांनीच अर्ज केले आहेत. अद्यापही शहरातील सुमारे २०० हून अधिक गणेश मंडळांनी मंडप, कमानीसाठी अर्ज केलेला नाही.  परंतु आता मंडप, कमांनी घालण्यास सुरुवात झाल्याने व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकांकडून जोरदार तापसणी सुरु झाली आहे. यामुळे शिल्लक गणेश मंडळांकडून परवानगी मिळावी, महापालिकेने अर्ज स्विकारावेत यासाठी राजकीय दबाव सुरु केला आहे. यंदा ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील अर्ज स्विकारल्याने ऑफ लाईन बॅक डेटेड तारखा दाखवून या मंडळांना परवानगी देण्याच्या देखील हालचाली सुरु आहेत. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Courtन्यायालयPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका