शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एमआयटी शिक्षण संकुलातील २१ वर्षीय विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 23:04 IST

पूर्व हवेलीतील नामांकित एमआयटी शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलात डिझाईन विभागात चौथ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या बंगलोर येथील एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

लोणी काळभोर :

पूर्व हवेलीतील नामांकित एमआयटी शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलात डिझाईन विभागात चौथ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या बंगलोर येथील एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. जॉर्डन पब्लिसीयेस (वय २१, मूळ रा. बेंगलोर कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जॉर्डन पब्लिसीयेस हा विद्यार्थी एमआयटी शैक्षणिक संकुलातील डिझाईन कॉलेजमध्ये चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता.

मागील दोन दिवसापासून जॉर्डन हा तणावामध्ये होता. दरम्यान, एमआयटीतील सुरक्षा रक्षकांना आज पाच वाजण्याच्या सुमारास जॉर्डनने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी तत्काळ ही माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, लोणी काळभोर पोलीस व सुरक्षारक्षकांच्या मदतीने जॉर्डनचा मृतदेह खाली उतरविण्यात आला आहे. मात्र जॉर्डन याने आत्महत्या का केली आहे. याचे कारण अद्याप समजू शकलेली नाही. लोणी काळभोर पोलिसांनी या घटनेची माहिती जॉर्डनच्या आई-वडिलांना दिलेली आहे. जॉर्जिनचे वडील आज बेंगलोर वरून संध्याकाळी दहा वाजता विमानाने पुण्याला येणार आहेत. लोणी काळभोर पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे