शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 00:04 IST

सोमवारी (दि १) तालुक्याच्या आढे गावा जवळ पहाटे हा अपघात झाला.

राजेंद्र मांजरे -

राजगुरुनगर : मोफत पंढरपूर यात्रा करून परतलेल्या बसला खेड तालुक्यात अपघात होऊन २१ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. खेड तालुक्यात विधानसभा निवडणुक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवाराच्या गाडीला हा अपघात झाला आहे. अपघातातील २१ जणांवर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी (दि १) तालुक्याच्या आढे गावा जवळ पहाटे हा अपघात झाला.

पंढरपूर दर्शन करून यात्रेकरूंना गावोगावी सुखरूप परत घरी सोडण्यासाठी बस आली असताना तांबडे वाडी वरुन निघाली. आढे गावा जवळ आल्यावर रस्त्याच्या कडेला चिखलात घसरून खड्यात चाक उतरल्याने बस पलटली. त्यातील वीस पंचवीस भाविक आतमध्ये सीटवर तसेच एकमेकांवर आदळून जखमी झाले.खेड तालुक्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकी पुर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांकडून विविध प्रकारची प्रलोभने दाखवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.त्याचाच एक भाग म्हणून आषाढी वारी सुरू असताना पंढरपूर दर्शनाचा लाभ मतदारांना देण्याचा आटापिटा इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातPandharpurपंढरपूर