खालुम्ब्रेत २१ बचत गटांना २१ लाखांचे अनुदान वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:19 IST2021-02-21T04:19:58+5:302021-02-21T04:19:58+5:30
ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटांच्या माध्यमातून संघटन करून त्यांना संघटनात्मक नेतृत्व, आर्थिक साक्षरता व व्यवसायिक कौशल्य आशा विविध प्रकारच्या ...

खालुम्ब्रेत २१ बचत गटांना २१ लाखांचे अनुदान वाटप
ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटांच्या माध्यमातून संघटन करून त्यांना संघटनात्मक नेतृत्व, आर्थिक साक्षरता व व्यवसायिक कौशल्य आशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणातून त्यांना व्यवसायिक संधी देऊन त्यांची उपजिविका वृद्धी करणेसाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या वतीने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यात प्रभावीपणे राबवित आहे. या अभियानांतर्गत स्थापित बचत गटांच्या महिलांनी छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू केले असून त्या व्यवसायातून महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. सद्याच्या सोशल नेटवर्किंगच्या काळातही या बचत गटांच्या महिलांचे उद्योग मोठी भरारी घेताना दिसत आहेत. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून खालुम्ब्रे येथे या अभियाना अंतर्गत बचत गटांची नोंदणी करून बँक ऑफ बडोदा शाखा महाळुंगे यांचेकडून प्रत्येकी गटासाठी सहाय्यक अनुदान देण्यात आले आहे.
महिला बचत गटांना एकत्र साहाय्यक अनुदान धनादेश वाटप यावेळी सरपंच सोनल बोत्रे यांच्या हस्ते सभागृहात देण्यात आले. या कार्यक्रमाला खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुखदेव साळुंखे, रवींद्र कंगरे, ग्रामपंचायत सर्व सदस्य, मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोत्रे यांनी केले.
--
अभियानांतर्गत आज खालुम्ब्रे येथील एकवीस बचत गटांना एकवीस लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, उद्योग व्यवसाय करण्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध व्हावे यासाठी खालुम्ब्रे येथे बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे.
- सोनाल बोत्रे, सरपंच,ग्रामपंचायत खालुम्ब्रे
---
फोटो : महाळुंगे बचत गट अनुदान वाटप
फोटो : सरपंच सोनल बोत्रे यांच्या हस्ते महिला बचत गटांना धनादेश वाटप