वाघोलीत तिघांकडून २१ किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST2021-07-20T04:10:22+5:302021-07-20T04:10:22+5:30

पुणे : पुणे-नगर रोडवरील वाघोली येथे गांजाविक्रीसाठी आलेल्या तिघांना अमली पदार्थविरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून ४ लाख ३० हजार रुपयांचा ...

21 kg cannabis seized from three in Wagholi | वाघोलीत तिघांकडून २१ किलो गांजा जप्त

वाघोलीत तिघांकडून २१ किलो गांजा जप्त

पुणे : पुणे-नगर रोडवरील वाघोली येथे गांजाविक्रीसाठी आलेल्या तिघांना अमली पदार्थविरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून ४ लाख ३० हजार रुपयांचा २१ किलो गांजा जप्त केला आहे.

अक्षय अंबादास बिडगर (वय २५, रा. राजाराम पाटीलनगर, खराडी), सोनल किसन काळे (वय १९, रा. जामखेड, जि. नगर), सागर गोपीनाथ पोले (वय १९, रा. कंधार, जि. नांदेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार नितीन जगदाळे व युवराज कांबळे यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी रात्री वाघोली येथील वाघेश्वर मंदिरासमोर सापळा लावला. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका कार तेथे आली. तिला थांबवून कारची तपासणी केल्यावर त्यात २१ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी कारसह ६ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: 21 kg cannabis seized from three in Wagholi