शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमआरडीए’ला २१ हेक्टर जागा देण्यास मंजुरी : मंत्रिमंडळाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 15:47 IST

‘पीएमआरडीए’ने या मेट्रो मार्गालगतच्या व्यापारी व व्यावसायिक मूल्य असलेल्या एकूण २१ हेक्टर ९१ आर शासकीय जमिनी वर्ग करून मिळणे आवश्यक व अपरिहार्य असल्याचे शासनास कळविले होते.

ठळक मुद्देतीन विभागांची एकूण २१ हेक्टर ९१ आर जागा मिळणार

पुणे : पीएमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.२ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीसाठी राज्य शासनाच्या हिश्शाच्या व्यवहार्यता तफावत निधी रोखीने देण्याऐवजी प्राधिकरणास जमीन देण्यास मान्यता मिळाली आहे. प्रामुख्याने शासकीय तंत्रनिकेतन व दुग्ध विकास व पोलीस विभाग या तीन विभागांकडील एकूण २१ हेक्टर ९१ आर इतकी जागा ‘पीएमआरडीए’ला हस्तांतरण करण्यास मंत्रिमंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे.‘पीएमआरडीए’ने या मेट्रो मार्गालगतच्या व्यापारी व व्यावसायिक मूल्य असलेल्या एकूण २१ हेक्टर ९१ आर शासकीय जमिनी वर्ग करून मिळणे आवश्यक व अपरिहार्य असल्याचे शासनास कळविले होते. त्यानुसार, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या हिश्शाचा व्यवहार्यता तफावत निधी रोखीने देण्याऐवजी प्राधिकरणास जमिनी हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. शासकीय तंत्रनिकेतन यांच्या अखत्यारितील १० हेक्टर ६० आर, तसेच शासकीय दुग्ध योजना यांच्या ताब्यातील ७ हेक्टर १४ आर, आणि पुणे ग्रामीण पोलिस व बिनतारी संदेश यंत्रणा यांच्या ताब्यातील टायग्रीस कॅम्प भागातील ४ हेक्टर १७ आर इतकी जमीन पीएमआरडीएला कायम कब्जे हक्काने देण्यास मान्यता दिली. या जमिनींच्या वाणिज्यिक विकासातून पीएमआरडीए व्यवहार्यता तफावत निधी उभारणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा सुमारे २३.२ किलोमीटर लांबीचा मेट्रो प्रकल्प आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ८ हजार ३१२ कोटी रुपये आहे. ‘पीएमआरडीए’चा मेट्रो प्रकल्प हा गरजेचा सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केलेला आहे. चौकटशासनाने ८१२ कोटी रूपये देणे आपेक्षितमेट्रो प्रकल्पाच्या व्यवहार्यता तफावत निधीपोटी प्राधिकरणास ८१२ कोटी रुपये रक्कम राज्य शासनाने देणे अपेक्षित आहे. मात्र, थेट रक्कम देण्याऐवजी प्राधिकरणास जमिनीचे हस्तांतरण करून तसेच या शासकीय व खासगी जमिनीच्या व्यावसायिक विकासातून निधीची उभारणी करण्यास यापूर्वीच मान्यता दिली होती. 

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीए