नागरी सदस्यपदासाठी २१ अर्ज

By Admin | Updated: June 19, 2014 05:31 IST2014-06-19T05:31:48+5:302014-06-19T05:31:48+5:30

बोर्डाचे अध्यक्ष यातील तीन नावांची शिफारस केंद्र सरकारकडे दोन दिवसांत करणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

21 applications for civilian membership | नागरी सदस्यपदासाठी २१ अर्ज

नागरी सदस्यपदासाठी २१ अर्ज

किवळे : कॅन्टोन्मेंट कायद्यानुसार बोर्डाचा कारभार पाहण्यासाठी केंद्र सरकारकडून नेमण्यात येणाऱ्या त्रिसदस्यीय समितीतील एका नागरी सदस्याच्या नियुक्तीसाठी देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासनाकडे सहा माजी उपाध्यक्ष, दोन निवृत्त अधिकारी, तसेच शिवसेना-भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह एकूण २१ इच्छुकांनी अर्जाद्वारे माहिती सादर केली आहे. बोर्डाचे अध्यक्ष यातील तीन नावांची शिफारस केंद्र सरकारकडे दोन दिवसांत करणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
संरक्षण मंत्रालयाने कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्यांची दुसऱ्यांदा वाढवलेली सहा महिन्यांची मुदत ५ जूनला संपल्याने देशातील ५८ पैकी ५५ बोर्ड एका वर्षासाठी बरखास्त करण्याचा निर्णय देहूरोड बोर्ड प्रशासनाला ४ जूनला कळविण्यात आला होता. त्यानंतर रक्षा संपदा विभागाच्या संचालकांनी बोर्डाला १२ जूनला पाठविलेल्या पत्रानुसार सरकारनियुक्त नागरी सदस्यपदासाठी बोर्डाच्या हद्दीतील इच्छुक नागरिकांकडून त्यांची संपूर्ण माहिती १८ जूनअखेर मागविली होती. त्यानुसार बोर्डाकडे ७ वॉर्डांतील २१ इच्छुकांनी संपूर्ण माहिती बोर्डाकडे सादर केली आहे.
बोर्ड कार्यालयामार्फत सर्व इच्छुकांची यादी व माहिती बोर्डाच्या अध्यक्षांकडे पाठविण्यात येईल. २ दिवसांत अध्यक्ष यातील ३ नावांची शिफारस केंद्र सरकारकडे करणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: 21 applications for civilian membership