शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

पुणे शहरात तब्बल २०६ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 12:58 IST

रुग्णांच्या घरगुती विलगीकरणाने प्रतिबंधित क्षेत्रात होतीये वाढ

ठळक मुद्देशहरात हडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्वाधिक सक्रिय रुग्ण

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे. असंख्य रुग्ण हे लक्षणविरहित असल्याने गृहविलगीकरणात आहेत. त्यामुळे शहरात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वाढले असून शुक्रवारपर्यंत तब्बल २०६ झाले आहेत. त्यामध्ये ७८ इमारती आणि ९५ हाऊसिंग सोसायटी ३३ छोटे परिसर यांचा समावेश आहे. 

पुणे महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांतर्गत इमारत, सोसायटी आणि छोटा परिसर असे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. चार किंवा पाच इमारती असणाऱ्या एखाद्या हाऊसिंग सोसायटी आणि छोट्या परिसरात  २० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास ती सोसायटी आणि छोटा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली जाते. एखाद्या इमारतीमध्ये ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास ती इमारत सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली जात आहे. इमारती किंवा सोसायटीमध्ये असणाऱ्या रुग्णांच्या हातावर स्टॅम्प मारला जातो. तसेच दोन्हीच्या प्रवेशद्वारावर रुग्णांचे नावही लिहिले जात आहे. रुग्णांना या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातून आत - बाहेर करण्यास सक्त मनाई आहे. तसे केल्यास महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. 

दररोज रुग्णांच्या संख्येत चढ - उतार होत आहे. त्यामुळे या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राच्या संख्येतही बदल होणार आहेत. शहरातील सर्व क्षेत्र हे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सोपवण्यात आले आहेत. त्यानुसार आकडेवारीतही बदल होणार आहेत. पुणे शहरात सद्यस्थितीत २९ हजार ९८३ सक्रिय रुग्ण आहेत. काल दिवसभरात ३ हजार ५९४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 

पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असणारे सक्रिय रुग्ण 

हडपसर - मुंढवा रस्ता - ४४४ धनकवडी - सहकारनगर - ३१३ वडगाव शेरी - नगर रस्ता - २७९औंध - बाणेर - २४८ सिंहगड रस्ता - २४७ कोथरूड - बावधन - २४६ वारजे - कर्वेनगर - २२४बिबवेवाडी - २१९ कसबा - विश्रामबाग - २०३ कोंढवा - येवलेवाडी - १८६ शिवाजीनगर - घोले रस्ता - १५१ ढोले पाटील रस्ता - १४१ येरवडा - कळस - धानोरी - १२६ भवानी पेठ - १०८ 

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लस