शहरात धावणार २०० ‘मिडी’ बस

By Admin | Updated: September 7, 2016 01:45 IST2016-09-07T01:45:31+5:302016-09-07T01:45:31+5:30

शहराच्या गल्लीबोळांमध्ये पीएमपीच्या मोठ्या बसची वाहतूक करणे त्रासदायक ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर पीएमपीसाठी २०० मध्यम आकाराच्या (मिडी) बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

200 'MIDI' bus will run in the city | शहरात धावणार २०० ‘मिडी’ बस

शहरात धावणार २०० ‘मिडी’ बस

पुणे : शहराच्या गल्लीबोळांमध्ये पीएमपीच्या मोठ्या बसची वाहतूक करणे त्रासदायक ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर पीएमपीसाठी २०० मध्यम आकाराच्या (मिडी) बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी पुणे महापालिकेच्या वतीने १२० बसची खरेदी करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. उर्वरित ८० बसची खरेदी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून केली जाणार आहे.
पीएमपीसाठी नुकतीच १५५० मोठ्या बस खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर
शहराच्या मध्यवस्तीमध्ये तसेच कमी प्रवासी असलेल्या मार्गावर चालविण्यासाठी मध्यम आकाराच्या बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहराची गरज लक्षात घेऊन मध्यम आकाराच्या बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीकडून त्यांच्या आवश्यक्तेनुसार बस कशी असावी, याचा अहवाल मागवण्यात येणार आहे.
पीएमपीला निधी देऊन त्याच्या माध्यमातून बस खरेदी
करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. मात्र, ही खरेदी महापालिकेनेच निविदा प्रक्रिया राबवून करावी, अशी उपसूचना स्थायी समितीच्या सदस्यांनी दिली. त्यानुसार उपसूचनेसह बस खरेदीला मंजुरी देण्यात आली.
(प्रतिनिधी)

Web Title: 200 'MIDI' bus will run in the city