शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘सीईटी’साठी ११वीचा २० टक्के अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 06:42 IST

राज्यात अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाºया सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी-सीईटी) इयत्ता अकरावीचा २० टक्के अभ्यासक्रम असणार आहे.

पुणे : राज्यात अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाºया सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी-सीईटी) इयत्ता अकरावीचा २० टक्के अभ्यासक्रम असणार आहे. मे २०१८ मध्ये होणाºया सीईटीपासून हा बदल लागू केला जाणार आहे.तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) सीईटीचा अभ्यासक्रम, पॅटर्न याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. मागील वर्षापर्यंत ही परीक्षा केवळ राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित घेतली जात होती. देशपातळीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ‘जेईई’ व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ‘नीट’ या परीक्षा ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमानुसार घेतल्या जातात. त्यामध्ये राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. राज्य मंडळाचा अभ्यासक्रम तुलनेने मागे असल्याचे विद्यार्थी-पालक तसेच तज्ज्ञांकडून सांगितले जात होते. त्यामुळे राज्य शासनाने अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याबरोबरच सीईटीचा अभ्यासक्रम, काठिण्य पातळी, पॅटर्नमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मे २०१८मध्ये होणारी सीईटी या बदलांप्रमाणे घेतली जाणार आहे. या परीक्षेमध्ये आता राज्य मंडळाचा अकरावीचा २० टक्के अभ्यासक्रमाचा समावेश केला आहे. बारावीच्या अभ्यासक्रमाला ८० टक्के महत्त्व दिले जाईल. निगेटिव्ह मार्किंग पद्धत परीक्षेसाठी नसेल. ‘सीईटी’साठी गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांची काठिण्यपातळी ‘जेईई (मेन्स)’प्रमाणे तर जीवशास्त्र विषयाची काठीण्यपातळी नीटप्रमाणे असेल. परीक्षेसाठी प्रत्येकी १०० गुणांच्यातीन प्रश्नपत्रिका असतील. ‘सीईटी’साठी चारही विषयांचा इयत्ता अकरावीचा अभ्यासक्रमही डीटीईने प्रसिद्ध केला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीPuneपुणेeducationशैक्षणिक