ओतूर परिसरात २० नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:11 IST2021-04-27T04:11:24+5:302021-04-27T04:11:24+5:30

ओतूर परिसरात रविवारी केवळ ७ रुग्ण सापडले होते. परंतु सोमवारी एकूण २० नवीन रुग्ण सापडले आहेत .त्यामुळे ...

20 new patients in Ootur area | ओतूर परिसरात २० नवीन रुग्ण

ओतूर परिसरात २० नवीन रुग्ण

ओतूर परिसरात रविवारी केवळ ७ रुग्ण सापडले होते. परंतु सोमवारी एकूण २० नवीन रुग्ण सापडले आहेत .त्यामुळे ग्रामस्थ चिंताग्रस्त आहेत .

सोमवारी परिसरातील डिंगोरे ५, उदापूर ५, ओतूर ,रोहोकडी डुंबरवाडी ,पाचघर प्रत्येक गावात दोन दोन खामुंडी व तेजेवाडी प्रत्येक गावात एक एक असे एकूण २० नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे परिसरातील बाधितांची संख्या १ हजार ६०३ झाली आहे.१ हजार २४९ बरे झाले आहेत. २५२ ,जण कोविड सेंटर तर४१ जण घरीच उपचार घेत आहेत ६१,जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती डॉ. सारोक्ते यांनी दिली.

सोमवारी डिंगोरे गावातील बाधितांची संख्या १२१ झाली आहे ८७ बरे झाले आहेत ३० जण कोविड सेंटर ३ ,जण घरीच उपचार घेत आहेत एकाचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 20 new patients in Ootur area