शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Pune Corona Update: पुण्यात गुरुवारी तब्बल २ हजार २८४ जणांना कोरोनाची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 20:22 IST

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजार ६६५ झाली आहे

पुणे :पुणे शहरात गुरुवारी २ हजार २८४ नव्या कोरोनाबाधित (corona infection in pune city) रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७९ ने वाढली आहे. बुधवारी शहरात १ हजार ८०५ कोरोनाबाधित आढळून आले होते. शहरातील बाधितांची टक्केवारी अर्थाव पॉझिटिव्हिटी रेट १४.४७ (positivity rate in pune) टक्के इतका नोंदवला गेला आहे. आठ महिन्यांनी रुग्णसंख्येने २००० चा टप्पा ओलांडला आहे.

गेल्या आठवड्याभरापासून शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ३० डिसेंबरपर्यंत शहरातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या २५०-३०० यादरम्यान आढळून येत होती. त्यानंतर ३१ डिसेंबरपासून अचानक रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली. सुरुवातीला रुग्णसंख्येने ५०० चा टप्पा ओलांडला. आता २००० हून अधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. यापूर्वी १३ मे २०२१ रोजी २३९३ रुग्णांची नोंद झाली होती. म्हणजेच तब्बल आठ महिन्यांनी पुन्हा रुग्णसंख्येचा आलेख वाढू लागला आहे. वाढत्या कोरोनाबाधितांकडे धोक्याची घंटा म्हणून पाहिले जात आहे. शहरात कडक निर्बंध लागू होणार का, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार, शहरात गुरुवारी १५ हजार ७७५ चाचण्या झाल्या. त्यापैकी २२८४ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, तर ८० जणांना घरी सोडण्यात आले आहे. तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. १०६ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरु आहेत. २८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाबाधितांपैकी केवळ ७.८४ टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असून, इतर रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ७६६५ झाली आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत शहरात ३९ लाख २२ हजार ९७ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख १६ हजार ७७८ जणांचे कोरोनाचे निदान झाले. त्यापैकी ४ लाख ९९ हजार ९९१ जणांना पूर्ण बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले. शहरात आतापर्यंत ९१२२ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या