व्यापाऱ्याने दिलेली २ लाख ८६ हजार रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:10 IST2021-03-31T04:10:48+5:302021-03-31T04:10:48+5:30

टेम्पोचालक नागेश सोपान गायकवाड हा २ लाख ८६ हजार रुपये रक्कम घेऊन फरार झाला असल्याची तक्रार अनिल चंद्रकांत फलके ...

2 lakh 86 thousand given by the trader | व्यापाऱ्याने दिलेली २ लाख ८६ हजार रक्कम लंपास

व्यापाऱ्याने दिलेली २ लाख ८६ हजार रक्कम लंपास

टेम्पोचालक नागेश सोपान गायकवाड हा २ लाख ८६ हजार रुपये रक्कम घेऊन फरार झाला असल्याची तक्रार अनिल चंद्रकांत फलके यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर येथील अनिल चंद्रकांत फलके यांचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्याजवळ असलेल्या टेम्पोवर नागेश सोपान गायकवाड (रा. बोरगाव, जि. नांदेड, सध्या रा.मंचर) हा चालक म्हणून काम करतो. फिर्यादी फलके यांचा टेम्पो (एम.एच.४३ वाय. ५९८० )यामध्ये कांदा भरून मुंबई येथील विरार येथे खाली करण्यासाठी गेला होता. तेथील व्यापारी यांनी दिलेली रोख रक्कम २ लाख ८६ हजार रुपये ही चालक गायकवाड त्याच्याकडे दिली. ही रक्कम फलके यांच्या घरी देण्यास सांगितले असता गायकवाड याने रोख रक्कम स्वतःजवळ ठेवून टेम्पो फिर्यादीच्या बिल्डिंगजवळ सोडून तो फरार झाला आहे. ही घटना २७ ते २८ मार्चच्या दरम्यान घडली आहे. तपास पोलीस नाईक राजेंद्र हिले करत आहेत.

Web Title: 2 lakh 86 thousand given by the trader