सोरटेवाडी केंद्रावर २ गटांत हाणामारी, निवडणुकीला गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:38 AM2017-10-17T02:38:23+5:302017-10-17T02:41:14+5:30

बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी, गडदरवाडी या चार ग्रामपंचायतींसाठी सोमवारी (दि. १६) शांततेत मतदान झाले. मात्र, सोरटेवाडी येथे निवडणुकीला गालबोट लागून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.

2 groups in the Sorotevadi center | सोरटेवाडी केंद्रावर २ गटांत हाणामारी, निवडणुकीला गालबोट

सोरटेवाडी केंद्रावर २ गटांत हाणामारी, निवडणुकीला गालबोट

Next

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी, गडदरवाडी या चार ग्रामपंचायतींसाठी सोमवारी (दि. १६) शांततेत मतदान झाले. मात्र, सोरटेवाडी येथे निवडणुकीला गालबोट लागून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी असणारा एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व मतदान यंत्रणा पोहोचली होती. सोमवारी सकाळपासूनच या ठिकाणी मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी मतदारांची संख्या जादा आणि एकच मशिन असल्याने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एक ते दोन तास मतदारांना ताटकळत बसावे लागले होते. मुरूम, वाणेवाडी, गडदरवाडी व वाघळवाडी या सर्वच ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. मात्र, सोरटेवाडी येथे मतदानाला गालबोट लागून दुपारी दोन वाजता ३० ते ४० लोकांमध्ये काठ्या आणि दगडांनी तुबळ हाणामारी झाली. गेल्या महिन्यात झालेल्या सोसायटी निवडणुकीचा राग मनात असल्याने ही मारीमारी झाल्याचे बोलले जाते. यामध्ये एक पोलीस क र्मचारी जखमी झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांची एसआरपीएफची तुकडी दाखल झाल्यानंतर या ठिकाणी बंदोबस्तात पुन्हा मतदान सुरू झाले. दरम्यान, तहसीलदार हनुमंत पाटील आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली; त्यामुळे मोठा अनर्थ ठळला. सर्वाधिक चुरस ही वाघळवाडी येथील ग्रामपंचायतीत बघायला मिळाली. या ठिकाणी सरपंचपदासाठी ४ उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येक उमेदवार व कार्यकर्ते प्रत्येक मतदारराजाच्या दारात जाऊन मतदान केंद्रावर मतदानासाठी घेऊन येत होते. मुरूम आणि वाणेवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांचे आपल्या स्वत:च्या वाहनातून मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
पंधरा दिवसांपासून सुरू असलेला प्रचार आणि मतदान मतपेटीत बंद झाल्याने उमेदवार आता निवडणूक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. उद्या (मंगळवारी) बारामती येथील रीक्रिएशन हॉलमध्ये सकाळी आठपासूनच मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येतील.

Web Title: 2 groups in the Sorotevadi center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे