राममंदिरासाठी शिर्के उद्योग समूह आणि पुसाळकरांकडून २ कोटी ५१ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:00+5:302021-01-08T04:26:00+5:30

पुणे : बी. जी. शिर्के उद्योग समूह आणि इंडो शॉटले कंपनी या पुण्यातील उद्योगांनी अयोध्येतील राममंदिर निर्माणासाठी अडीच कोटी ...

2 crore 51 lakhs from Shirke Industries Group and Pusalkar for Ram Mandir | राममंदिरासाठी शिर्के उद्योग समूह आणि पुसाळकरांकडून २ कोटी ५१ लाख

राममंदिरासाठी शिर्के उद्योग समूह आणि पुसाळकरांकडून २ कोटी ५१ लाख

पुणे : बी. जी. शिर्के उद्योग समूह आणि इंडो शॉटले कंपनी या पुण्यातील उद्योगांनी अयोध्येतील राममंदिर निर्माणासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी समर्पित केला. उद्योजक अजय शिर्के, विजय शिर्के यांनी १ कोटी ५१ लाख रुपये आणि उद्योजक रोहन विजय पुसाळकर यांनी एक कोटी रुपये असा एकूण दोन कोटी एकावन्न लाख रुपयांचा निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्याकडे सुपूर्द केला.

सह सरकार्यवाह कृष्ण गोपालजी, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सचिव चंपतरायजी, विश्‍व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटन मंत्री विनायक देशपांडे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर, रा. स्व. संघाचे शहर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यावेळी उपस्थित होते.

‘मनामनातील राम जागवून राष्ट्र मंदिर घडवूया’ या विचाराला अनुसरून देशभरातील अनेक उद्योजक आणि दानशूर मंडळी राममंदिराच्या निर्मितीसाठी सढळ हाताने सहयोग देत आहेत, ही निश्‍चितच अभिनंदनाची बाब आहे. याच भावनेतून शिर्के आणि पुसाळकर यांनी दिलेल्या निधीतून राष्ट्रीय कर्तव्याची पूर्तता केल्याची भावना व्यक्त होते असे भैयाजी जोशी म्हणाले.

अजय शिर्के म्हणाले, “चांगल्या कामांसाठी मदत करणे हे भारतीय परंपरेत सामाजिक कर्तव्य मानले जाते. याच परंपरेला अनुसरून श्रीराम मंदिर निर्माणासाठी आम्ही निधी समर्पित करून या कार्यात सहभाग घेतला आहे. एका राष्ट्रीय कार्यात सहभागी झाल्याचा अनुभव या निमित्ताने आम्ही घेत आहोत.” रोहन पुसाळकर म्हणाले, “प्रत्येक भारतीयाने श्रीराम मंदिर निर्माणासाठी सहयोग द्यावा या संकल्पनेतून आम्ही या सांस्कृतिक कामासाठी निधी समर्पित केला.”

Web Title: 2 crore 51 lakhs from Shirke Industries Group and Pusalkar for Ram Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.