ओतूर परिसरातील तेजेवाडी येथे २ कोरोना पाँझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:12 IST2021-03-10T04:12:07+5:302021-03-10T04:12:07+5:30

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेतील तेजेवाडी येथे मंगळवारी २कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दि ७ मार्च ऱोजी ...

2 corona positive at Tejewadi in Ootur area | ओतूर परिसरातील तेजेवाडी येथे २ कोरोना पाँझिटिव्ह

ओतूर परिसरातील तेजेवाडी येथे २ कोरोना पाँझिटिव्ह

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेतील तेजेवाडी येथे मंगळवारी २कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दि ७ मार्च ऱोजी डुंबरवाडी येथे २ ,तर हिवरे खूर्द येथे १ रुग्ण असे एकूण ३ रुग्ण मिळाले होते. दि.८ मार्चला परिसरात एकही रुग्ण नव्हता पण दि.९ मार्चला तेजेवाडी येथे २ रुग्ण सापडल्याने परिसरातील बाधितांची एकूण संख्या ९३१ झाली असून त्यातील ८७३ बरे झाले आहेत. १० जणावर उपचार सुरु आहेत .४८ जणांचा मृत्यू झाला आहे,असे ओतूर चे वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीहरी सारोक्ते यांनी सांगितले .

तेजेवाडी येथील एकूण बाधितांची संख्या ३९ झाली आहे. त्यातील ३६ बरे झाले आहेत २ जणावर उपचार सुरु आहेत . एकाचा मृत्यू झाला आहे, असे डॉ. सारोक्ते म्हणाले .

Web Title: 2 corona positive at Tejewadi in Ootur area