मोटारीची काच फोडून लांबविले १८ हजार
By Admin | Updated: March 24, 2017 04:13 IST2017-03-24T04:13:49+5:302017-03-24T04:13:49+5:30
रस्त्यावर उभ्या केलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप आणि १८ हजारांची रोख रक्कम पळवून नेल्याच्या दोन घटना

मोटारीची काच फोडून लांबविले १८ हजार
पिंपरी : रस्त्यावर उभ्या केलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप आणि १८ हजारांची रोख रक्कम पळवून नेल्याच्या दोन घटना पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी घडल्या. दिवसाढवळ्या महापालिका इमारतीसमोर वाहनाची काच फोडून झालेल्या चोरीच्या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
मोरवाडी येथे मोटारीची काच फोडून लॅपटॉप आणि रोकड लंपास केल्याची घटना घडली. तसेच महापालिका भवनासमोर उभ्या केलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी रक्कम पळवली. चोरट्यांची परराज्यातील टोळी शहरात सक्रिय झाली आहे. त्यांचेच हे कृत्य असावे, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)