१८ लाखांची थकबाकी वसूल
By Admin | Updated: December 17, 2014 05:36 IST2014-12-17T05:36:06+5:302014-12-17T05:36:06+5:30
नुकत्याच विविध ठिकाणी झालेल्या महालोकन्यायालयांमध्ये कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या महावितरणच्या ६५४ ग्राहकांनी थकित

१८ लाखांची थकबाकी वसूल
बारामती : नुकत्याच विविध ठिकाणी झालेल्या महालोकन्यायालयांमध्ये कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या महावितरणच्या ६५४ ग्राहकांनी थकित बिलापोटी १८ लाख रुपये भरले आहेत. बारामती परिमंडलातील विविध न्यायालयांमध्ये या महालोकन्यायालयांचे आयोजन करण्यात आले होते.
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार ग्राहकांना विभागीय कार्यालयांकडून पोस्टाकडून तर शाखा कार्यालय स्तरावर प्रत्यक्ष नोटीस देण्यात आली होती आणि थकबाकीची रक्कम भरण्याचे तसेच लोकन्यायालयात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. यात बारामती मंडलात ३७५ ग्राहकांनी ८ लाख रुपयांचा भरणा केला. सातारा मंडलात २३६ ग्राहकांनी ७ लाख रुपयांचा, सोलापूर मंडलात ४३ ग्राहकांनी ३ लाख रुपयांचा भरणा केला.
प्रभारी मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा मंडलाचे अधीक्षक अभियंता सुरेश गणेशकर, सोलापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय साळे यांच्या नेतृत्वात तसेच कनिष्ठ विधी अधिकारी नंदा महाले यांच्या समन्वयात बारामती परिमंडलातील अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले.(वार्ताहर)