शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
4
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
5
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
6
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
7
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
8
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
9
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
10
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
11
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
12
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
13
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
14
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
15
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
16
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
17
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
18
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
19
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
20
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
Daily Top 2Weekly Top 5

भोरमधील १८ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 06:25 IST

तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १५८ उमेदवारी अर्ज, तर ५४ ग्रामपंचायतींच्या ३६२ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४५४ जणांनी अर्ज दाखल केले

भोर : तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १५८ उमेदवारी अर्ज, तर ५४ ग्रामपंचायतींच्या ३६२ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४५४ जणांनी अर्ज दाखल केले. ५४ पैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून वाढाणे व सोनवडी या दोन ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. ५ आॅक्टोबर रोजी माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल.नोव्हेबर व डिसेंबर २०१७मध्ये मुदत संपणाºया तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ आॅक्टोबरला होत आहेत. सरपंचपदाची २०२०पर्यंतची आरक्षणाची सोडत २०१५मध्येच काढण्यात आली आहे. तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. इच्छुकांनी सर्व कागदपत्रे गोळा करून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हसर बुद्रुक, म्हसर खुर्द, शिरवलीतर्फे भोर, आपटी, हरिश्चंद्री, कोळवाडी, सांगवी खुर्द, करंदी बुद्रुक, आंबेघर दुर्गाडी, गुढे मळे, भुतोंडे, कोर्ले, बसरापूर, करंदी खुर्द, वाढाणे सोनवडी या १८ गावांच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने तालुक्यातील अनेक नेत्यांच्या गावांचा समावेश असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वेळी संपूर्ण गावाने मतदान करायचे असल्याने ही निवडणूक सर्वासाठी अत्यंत चुरशीची ठरणार असून अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भोर तालुक्यातील प्रत्येक गावातील राजकीय नेते आपली ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असून तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत