लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:06 IST2021-04-29T04:06:51+5:302021-04-29T04:06:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : घर दाखविण्याचा बहाणा करून आपण दोघे लग्न करू, असे सांगून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ...

लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : घर दाखविण्याचा बहाणा करून आपण दोघे लग्न करू, असे सांगून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिला गर्भवती करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बबलू (रा. वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी लोहगाव येथील एका १७ वर्षांच्या मुलीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२०मध्ये घडला होता. ही मुलगी लोहगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयात जात असताना तिची आरोपीशी ओळख झाली होती. त्याने घर दाखवितो, असा बहाणा करून तिला लोहगावमधील खंडोबामाळ डोंगरावर नेले. तेथे तिला आपण दोघे लग्न करू असे सांगून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आठ दिवसांनी तिला तुला सोन्याची अंगठी करायची आहे, असे सांगून पुन्हा त्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. हे आता उघड झाल्यानंतर विमानतळ पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे.