शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"आज तुला खल्लास करतो..." एकतर्फी प्रेमातून 17 वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 12:57 IST

प्रेमाला नकार दिल्याने आरोपीने तिला ठार मारण्याची धमकी होती

पुणे/किरण शिंदे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकतर्फी प्रेमातून 17 वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर या तरुणीच्या अल्पवयीन मैत्रीणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. 13 डिसेंबरच्या रात्री फुरसुंगीतील हरपळे वस्तीत हा प्रकार घडला. आशिष मारुती धनके (वय 24, हरपळे वस्ती, फुरसुंगी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. या अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करण्याचा उद्देशाने आरोपीने वारंवार तिचा पाठलाग केला. तिने प्रेमाला नकार दिल्याने आरोपीने तिला ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान फिर्यादी तरुणीने हा सर्व प्रकार आरोपीच्या पत्नीला सांगितल्याने आरोपी आणखी चिडला.  त्याने फिर्यादी तरुणीच्या घरात जबरदस्तीने घुसून त्याने "आज तुला खल्लास करतो, तुला जिवंत सोडणार नाही" असे बोलून हा त्यातील कोयत्याने वार केला. सुदैवाने फिर्यादी तरुणीने हा वार चुकवला. त्यानंतर आरोपीने आपला मोर्चा फिर्यादीच्या मैत्रिणीकडे वळवला. तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत विनयभंग केला. हडपसरपोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :HadapsarहडपसरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट