ओतूर उपबाजार आवारात १७ हजार ८६४ कांदा पिशवी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:09 IST2021-07-12T04:09:06+5:302021-07-12T04:09:06+5:30

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे रविवारी १७ हजार ८६४ कांदा पिशव्यांची आवक होऊन नं. १ ...

17 thousand 864 onion bags arrived at Ootur sub-market premises | ओतूर उपबाजार आवारात १७ हजार ८६४ कांदा पिशवी आवक

ओतूर उपबाजार आवारात १७ हजार ८६४ कांदा पिशवी आवक

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे रविवारी १७ हजार ८६४ कांदा पिशव्यांची आवक होऊन नं. १ गोळा कांद्यास प्रतवारीनुसार १० किलोस गोळा कांदा १९० रुपये ते २१० रुपये भाव मिळाला, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. संंजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.

रविवारी प्रतवारीनुसार १० किलोचे भाव : नं. १ गोळा कांदा १९० रुपये ते २१० रुपये,

कांदा नं. २-- सुपर कांदा १४० रुपये ते १९० रुपये,

कांदा नं. ३ गोल्टा -९० रुपये ते१४० रुपये ,

कांदा नं. ४-गोलटी /बदला -३० रुपये ते ९० रुपये

रविवारी बटाटा लसूण आवक झालीच नाही, असे ओतूर मार्केट कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी सांगितले.

Web Title: 17 thousand 864 onion bags arrived at Ootur sub-market premises