शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
4
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
5
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
6
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
7
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
10
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
11
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
12
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
13
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
14
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
15
"मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे, पण इंडस्ट्रीत एकटा लढलो", शाहिद कपूर स्पष्टच बोलला
16
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
17
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
18
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
19
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
20
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
Daily Top 2Weekly Top 5

शहरात १ हजार ६६७ जणांकडे ७ हजार ७३७ कोटींचा मिळकत कर थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:29 IST

पुणे : पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडे १ हजार ६६७ जणांकडे ७ हजार ७३७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक ...

पुणे :पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडे १ हजार ६६७ जणांकडे ७ हजार ७३७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सरकारी आणि निमसरकारी संस्थांकडे थकबाकीची रक्कमच ३५५ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. महापालिकेचे नुकसान करणारी अभय योजना राबविण्यापेक्षा या बड्या थकबाकीदारांकडून वसुलीसाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयुक्ताकडे केली आहे.

पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडे १ कोटीपेक्षा जास्त मिळकत कराची थकबाकी असलेल्या मिळकतीची माहिती सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मागितली होती. त्यातून ही धक्कादायक आकडेवारी उघडकीस आली आहे. शहरात १ हजार ३३६ मोबाइल टॉवर्सच्या केसेस असून त्यात अडकलेली रक्कम ४ हजार ३७६ कोटी रुपये आहे.१२३ कोटी रुपये संरक्षण खात्याची, तर ६८ कोटी रुपये महावितरणची थकबाकी आहे. या व्यतिरिक्त पीएमपीएमएलकडे १२० कोटी, बीएसएनएलकडे १४ कोटी, म्हाडा १४ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांकडे १० कोटी, विविध राज्य सरकारी खात्यांकडे १० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्याचाच अर्थ सरकारी, निमसरकारी संस्थांकडील थकबाकीची रक्कमच ३५५ कोटींच्या घरात आहे. यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त वसुलीसाठी प्रयत्न केले तरी नुकसान सहन करून अभय योजनेतून मिळणाऱ्या रकमेएवढे पैसे यांच्याकडून मिळतील. उर्वरित बड्या थकबाकीदारांपैकी ज्यांची प्रकरणे कोर्टात प्रलंबित आहेत तिथे विधी विभागाकडून प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे, असे विवेक वेलणकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Faces Huge Property Tax Arrears; Crores Owed by Many

Web Summary : Pune faces a staggering ₹7,737 crore in property tax arrears from 1,667 individuals. Government and semi-government bodies owe ₹355 crore alone. Activists urge focused recovery efforts instead of amnesty schemes, targeting major defaulters and pending court cases for efficient revenue collection.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेTaxकरMaharashtraमहाराष्ट्र