भोर तालुक्यात १६० जण आँक्सीजनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:10 IST2021-04-19T04:10:50+5:302021-04-19T04:10:50+5:30
भोर तालुक्यात कोरोनाग्रस्त असलेले ५२० जण उपचार घेत असुन यातील १६० जण आँक्सीजनवर आहेत.तर ९१ जणांचा आत्ता पर्यत मृत्यू ...

भोर तालुक्यात १६० जण आँक्सीजनवर
भोर तालुक्यात कोरोनाग्रस्त असलेले ५२० जण उपचार घेत असुन यातील १६० जण आँक्सीजनवर आहेत.तर ९१ जणांचा आत्ता पर्यत मृत्यू झालेला आहे.प्रशासन वेळोवेळी कोरोनाबाबत काळजी घ्या असे आवाहन करत असतानाही नागरिक याकडे नागरिक दुर्लक्ष करीतआहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्णाची संख्या मोठी झाली असल्यामुळे कोरोनाबाबत भोर प्रशासन हतबल झाले आहे.
भोर तालुक्यात मागील वर्षी १४ एप्रिल २० रोजी पहिला कोरोना रुग्ण सापडला होता.माञ यंदा कोरोनाची संख्या तीन अंकात झाली आहे . यंदा शासनाने शनिवार रविवार विकेएंड लाँडाऊन करुन इतर दिवशी ठराविक वेळेत अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन दिल्या असताना ही नागरिक शिस्तबद्ध न वागता बाजारात गदीॕ करतात.तसेच विनाकारण घराच्या बाहेर तोंडाला माक्स ,सँनिटायझर यांचा कमी प्रमाणात वापर करुन बिनधास्त बाहेर फिरतात.गावात सार्वजनिक ठिकाणी,दुकानात नागरिक गदीॕ करुन गप्पा मारताना दिसतात.तर तरुण मंडळे किक्रेटचे सामने खेळतात. तर बाहेर गावाहून आलेले नागरिक थेट गावात शिरतात शासनाच्या नियमाचे बंधन पाळत नसल्यामुळे गावा गावात कोरोना संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला आहे.
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी भोर प्रशासन विभागाने भोर शहरात ग्रामीण रुग्णालय ,मुकबधीर विद्यालयात ,आय टी आय नसरापुर ,ससेवाडी , वेळू ,या ठिकाण कोविंड सेंटर उभारलेली आहेत.परंतु नागरिक कोरोनाची काळजी घेत नसल्यामुळे ही कोविंड सेंटर रुग्णासाठी कमी पडू लागली आहेत. तरी देखील प्रशासनाने खाजगी रुग्णालयात बेंड उपलब्ध केले आहेत. व त्याची काळजी घेत आहेत.मागील वर्षाच्या तुलनेने यंदा एप्रिल महिन्यात तालुक्यात ६८ गावात कोरोना रुग्ण आढळून आले असून सर्व केंद्रावर आता पर्यत ३०७४ बांधिताची रुग्ण संख्या झाली असून ५२० जणावर उपचार सुरु आहेत.६८ गावात कोरोनाचा शिरकाव असुन भोर शहरासह ९ गावात १० पेक्षा अधिक रुग्ण आहेत.तर आता पर्यंत ९१ जणांचे मृत्यू झाले आहेत.
तालुक्यात ४५ हजार नागरिकांना पहिल्या टप्प्याचे लसीकरण झाले आहे.