शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वेल्हे तालुक्यात १६ वर्षीय मुलाला सर्पदंश; गावातील आरोग्य सुविधांच्या अभावामुळे आयसीयूत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 15:21 IST

गावात चांगले प्राथमिक आरोग्य केंद्र व या परिसरात गावागावात चांगले रस्ते पोहचले पाहीजेत अशी मागणी यावेळी येथील ग्रामस्थ वर्षानुवर्षे करित आहेत

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील चांदर येथील एका १६ वर्षीय विद्यार्थ्यांना सर्पदंश झाला होता त्यास वेळेत उपचार न मिळाल्याने त्याला पुणे येथील ससुन रुग्नालयात अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. दुर्गम अशा चांदर परिसरात आरोग्याच्या सुविधांचा अभाव व दळणवळच्या सोयीचा अभाव असल्याने येथील विद्यार्थ्यांवर अतिदक्षता विभागात दाखल करण्याची वेळ आली आहे. 

याबाबत सविस्तर माहीती अशी कि वेल्हे तालुक्यातील दुर्गम अशा चांदर गावातील चंद्रकांत गणपत सांगळे (वय १६) रविवार दि ६ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता गायी म्हैस घेऊन डोंगरात जात असताना त्याला वाटेतच सर्पदंश झाला. गावात रस्ता चांगला नसल्याने वाहतुकीची कोणतीही सोय या ठिकाणी नाही. चांदर पासुन ४० किलोमीटर अंतरावर पानशेत येथे फिरता दवाखाना उपलब्ध आहे. चांदर पासुन वेल्हे येथे उपचारासाठी चंद्रकांत सांगळे याला चांदर ते घिसर चार तास पायी चालत आणण्यात आले. त्यानंतर तेथुन पुढे एका दुचाकीवरुन त्याला वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात  उपचारासाठी आणण्यात आले यावेळी सायंकाळचे पाच वाजले होते.

सकाळी ११ ते ५ हा वेळ केवळ उपचार घेण्यासाठी व रुग्णालयात येण्यासाठी लागल्याने सांगळे गंभीर झाल्याने त्याला पुणे येथील ससुन रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथील त्याची अवस्था बघुन येथील डॅाक्टरांनी त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले. वेळेत उपचार मिळाले असते तर सांगळेला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले नसते असे येथील डॅाक्टरांनी सांगितले. वेल्हे तालुक्याच्या पानशेत परिसरातील वरच्या भागात शासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे येथील रुग्णांवर वेळेत उपचार मिळत नाहीत. असे चित्र सध्या या भागात पाहावयास मिळत आहेत.या परिसरात चांगले प्राथमिक आरोग्य केंद्र व या परिसरात गावागावात चांगले रस्ते पोहचले पाहीजेत अशी मागणी यावेळी येथील ग्रामस्थ वर्षानुवर्षे करित आहेत.

टॅग्स :Puneपुणेsnakeसापdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल