शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 16 हजार 118 बोगस लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 17:16 IST

केंद्र शासनाने 14 कोटी 7 लाख वसूल करण्याचे आदेश 

ठळक मुद्देजिल्हयातील सर्व तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांना तपासणी करण्याचे दिले आहेत आदेश

पुणे : गरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 16 हजार 118 बोगस लाभार्थी असल्याचे समोर आले आहे. यामध्ये तब्बल 14 कोटी 7 लाख रुपयांचा निधी वसूल करण्याचे आदेश केंद्र शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. याबाबत जिल्हयातील सर्व तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.  

केंद्र शासनाने गरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती. काही दिवसांपुर्वी तामिळनाडूमध्ये या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर केंद्र शासनाने सर्वच राज्यातील बोगस लाभार्थी शोधण्याचे आदेश दिले. देशातील अल्प भूधारक शेतकरी व पाच ऐकर व त्यापेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये जमा केले जातात. पुणे जिल्ह्यात आता पर्यंत या योजने अंतर्गत 5 लाख 31 हजार शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंद करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 16 हजार 118 शेतकरी सरकारी नोकर,  टॅक्स भरणारे  मोठे व्यवसायिक, अनेक मयत व्यक्तींचा देखील समावेश झाला असल्याचे समोर आले आहे.  या अपात्र लोकांच्या बँक खात्यात आता पर्यंत तब्बल 14 कोटी 7 लाख रूपये जमा केले असून, आता या सर्व पैशांची पुन्हा वसुली करण्यात येणार आहे. --------जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील बोगस लाभार्थांची तालुकानिहाय आकडेवारी

तालुका       लाभार्थी संख्या       वसूल करायचा निधीआंबेगाव       1171                       10462000बारामती       2394                    21486000भोर              633                        5506000दौंड               1673                      15256000हवेली            692                       6412000इंदापूर          1037                    8856000जुन्नर          2140                   17598000खेड              1473                   13052000मावळ           538                        4998000मुळशी           830                       7240000पुरंदर            1340                     11050000शिरूर            1925                     16440000वेल्हा              272                      2348000एकूण           16118                    14,07,04000

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारfraudधोकेबाजी