शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात '१६ एमएम ' ७१ चित्रपटांची नव्याने भर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 11:53 AM

'१६ एम एम' चित्रपटांचा इतिहास जतन व्हावा तसेच तो भावी पिढ्यांना ज्ञात व्हावा या उदात्त हेतूने देशपांडे यांनी हा ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केला आहे.

ठळक मुद्देया ७१ चित्रपटांपैकी सुमारे ६६ चित्रपट हे रंगीत असून पाच चित्रपट कृष्णधवल त्याकाळात १६ एम एम प्रिंट्समुळे खेडोपाडी चित्रपट पोहचविण्याचे फार मोठे कार्य साध्य

पुणे:  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील खजिन्यांत जुन्या काळातील १६ एमएम मधील ७१ चित्रपटांची नव्याने भर पडली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गाजलेल्या मराठी आणि हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. या ७१ चित्रपटांपैकी सुमारे पन्नास चित्रपट असे आहेत की, जे कोणत्याही स्वरूपात आतापर्यंत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे '१६ एमएम' चे हे दुर्मिळ चित्रपट म्हणजे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या दृष्टीने एक अनमोल ठेवा ठरला आहे. या ७१ चित्रपटांपैकी सुमारे ६६ चित्रपट हे रंगीत असून पाच चित्रपट कृष्णधवल आहेत. या चित्रपटांमध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या 'वारणेचा वाघ' या गाजलेल्या कादंबरीवर आधारित असलेला 'वारणेचा वाघ'(१९७०), प्रसिद्ध कवी ग.दि.माडगूळकर यांची कथा-पटकथा आणि संवाद असलेला आणि राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेला 'संत गोरा कुंभार' (१९६७) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत माने यांचा 'केला इशारा जाता जाता' (१९६५) आदी प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे तर रंगीत चित्रपटांमध्ये भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील या दिग्गज दिग्दर्शकांबरोबरच व्ही. शांताराम यांचा 'पिंजरा'(१९७२), आणि 'चंदनाची चोळी, अंग अंग जाळी' (१९७५), 'आयत्या बिळावर नागोबा' (१९७९), 'सुळावरची पोळी' (१९८०), दादा कोंडके यांची महत्वाची भूमिका असलेला 'गनिमी कावा' (१९८१), 'नवरी मिळे नवऱ्याला ' (१९८४), 'गुलछडी' (१९८४), 'चंबू गबाळे' (१९८९), 'दे धडक बेधडक' (१९९०) आणि 'प्रतिकार' (१९९१) आदी चित्रपटांचा समावेश आहे. 

    या संग्रहात मराठीबरोबरच एकूण २९ हिंदी चित्रपटांचा समावेश असून त्यामध्ये अमिताभ बच्चन यांचे गाजलेले 'सुहाग' (१९७९), 'अंधा कानून' (१९८३), 'नास्तिक' (१९८३) हे तीन चित्रपट तसेच 'एक दुजे के लिये' (१९८१), राज कपूर यांचा 'प्रेमरोग' (१९८२), 'घायल' (१९९०), 'बोल राधा बोल' (१९९२), 'विरासत' (१९९७) आणि 'अंदाज अपना अपना' (१९९४) आदी चित्रपटांचा समावेश आहे. 
     यासंदर्भात अधिक माहिती देताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले की, केवळ चित्रपटांची नावे लक्षात घेता हा संग्रह मोलाचा नाही तर १६ एम एम प्रिंट्सच्या दृष्टीने फार मोठा अनमोल ठेवा चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे. ज्या काळात फक्त शहरांमध्ये चित्रपट पाहणे ही केवळ चैनीची बाब होती त्या काळात ग्रामीण भागात १६ एम एम प्रिंट्सच्या मदतीने चित्रपट दाखविला जात होता. आणि ग्रामीण भागातील प्रेक्षक त्याचा आनंद घेत होते. 'तंबू' किंवा 'टुरिंग टॉकीज' मध्ये १६ एम एम प्रिंट्सच्या साहाय्याने चित्रपट वितरित केला जात असल्यामुळे चित्रपट खेडोपाडी पोहचविण्याचे फार मोठे कार्य त्याकाळात १६ एम एम प्रिंट्समुळे साध्य झाले आहे. म्हणूनच '१६ एम एम प्रिंट्स' च्या चित्रपटांना चित्रपटसृष्टीत अनन्यसाधारण असे महत्व आहे. 
      गेल्या पन्नास वर्षांपासून अधिक काळ 'तंबू' तसेच 'टुरिंग टॉकीज' मध्ये १६ एम एम चित्रपटांच्या वितरणाचा व्यवसाय करणारे साताऱ्याचे ज्येष्ठ वितरक अण्णा देशपांडे आणि त्याचे चिरंजीव दिनेश देशपांडे यांनी त्यांच्याकडील '१६ एम एम प्रिंट्स' चित्रपटांचा हा अनमोल ठेवा नुकताच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केला. '१६ एम एम' चित्रपटांचा इतिहास जतन व्हावा तसेच तो भावी पिढ्यांना ज्ञात व्हावा या उदात्त हेतूने देशपांडे यांनी हा ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केला आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या दृष्टीने ती नक्कीच गौरवास्पद बाब ठरली आहे.  

टॅग्स :PuneपुणेPrakash Magdumप्रकाश मगदूम