६५ जागांसाठी १५७ उमेदवार रिंगणात

By Admin | Updated: April 8, 2016 00:46 IST2016-04-08T00:46:19+5:302016-04-08T00:46:19+5:30

आंबेगाव तालुक्यात १४ ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जांभोरी वगळता एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही. उर्वरित १३ ठिकाणी ६५ जागांसाठी १५७ उमेदवार उभे राहिले आहेत.

157 candidates in fray for 65 seats | ६५ जागांसाठी १५७ उमेदवार रिंगणात

६५ जागांसाठी १५७ उमेदवार रिंगणात

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात १४ ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जांभोरी वगळता एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही. उर्वरित १३ ठिकाणी ६५ जागांसाठी १५७ उमेदवार उभे राहिले आहेत.
पूर्वी या भागातील ग्रामपंचायत बिनविरोध होत होत्या. मात्र, येथेही निवडणुकीमध्ये चढाओढ दिसून येत आहे. राजेवाडी जागा ७ : उमाजी उर्फ बेलनाथ मसळे, नंदा शिंदे, ज्योती तारडे हे ३ बिनविरोध. ४ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात. राजपूर जागा ७ : ज्ञानेश्वर लोहकरे, मेघा लोहकरे, जानकीबाई वायाळ हे तीन बिनविरोध. ४ जागांसाठी १० उमेदवारे. पिंपळगाव तर्फे घोडा जागा ९ : लताबाई दांगट, नीलम गुंजाळ हे २ बिनविरोध. ७ जागांसाठी १७ उमेदवार. गंगापूर बुद्रुक जागा ९ : वर्षा राऊत, बेबी केदारी हे दोन बिनविरोध. ८ जागांसाठी २२ उमेदवार. आंबेगाव गावठाण जागा ७ : आशा मोरे, नंदा जगदाळे, ऋषीकेश जगदाळे, गिरजू विरणक, नीलेश घोलप हे ५ बिनविरोध. २ जागांसाठी ५ उमेदवार. कोंढवळ एकही बिनविरोध नाही. ९ जागांसाठी २१ उमेदवार. पंचाळे बुद्रुक जागा ७ : ज्योती गोगटे, मारुती जढर, सविता जढर, हिराबाई तारडे, सीताबाई घोडे हे ५ बिनविरोध. तर, २ जागांसाठी ४ उमेदवार. आसाणे जागा ७ : दत्तू गभाले, पार्वती गभाले, गोविंद गभाले बिनविरोध. एक जागा रिक्त, तर ३ जागांसाठी ७ उमेदवार. पोखरी जागा ७ : नारायण सोळसे, सुनीता डाके, नंदा कोळप, छबूबाई बेेंढारी, पार्वता बेंढारी, सचिन भागित या ६ जागा बिनविरोध. तर, १ जागेसाठी २ उमेदवार. ढाकाळे जागा ७ : वैशाली डामसे, विठाबाई जाधव, अनुसया अंकुश बिनविरोध. तर, ४ जागांसाठी ८ उमेदवार. थोरांदळे एकही बिनविरोध नाही. ९ जागांसाठी २० उमेदवार उभे. शिनोली एकही बिनविरोध नाही. ११ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात आहेत.

Web Title: 157 candidates in fray for 65 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.