शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळ हद्द नकाशावर १५५७ शेतकऱ्यांनी नोंदविल्या हरकती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 19:34 IST

विमानतळासाठी दोन हजार हेक्टर  क्षेत्र लागणार असून उर्वरित ८३२ हेक्टर क्षेत्रावर विमानतळासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत .

ठळक मुद्देमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून अधिसूचित क्षेत्राचा विकास आराखडा जाहीरउर्वरित ८३२ हेक्टर क्षेत्रावर विमानतळासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार

सासवड: पुरंदर मधील बहुचर्चित व प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून अधिसूचित क्षेत्र जाहीर करून या क्षेत्राचा विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या सात गावातील विमानतळाच्या हद्दीचे नकाशे जाहीर करण्यात आले असून त्यावर १५५७  शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या आहेत .

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अधिसूचना जाहीर झाल्यानंतर हरकती घेण्याची सुरुवात २१ जून २०१९ ला सुरू झाली होती. शेवटची मुदत दिनांक १९ ऑगस्टला संपली. त्यामध्ये गाव निहाय दाखल झालेल्या हरकती पुढील प्रमाणे पारगाव ५०१,  उदाचीवाडी १२३,  एखतपूर ५६,  मुंजवडी ३९,  कुंभारवळण १४६,  खानवडी १८५,  वनपुरी ५०७  अशा एकूण १५५७ हरकती दाखल  झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी एकूण २८३२ हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. सर्वात जास्त पारगाव येथील १०३७ हेक्टर क्षेत्र जाणार आहे. त्याच बरोबर वनपुरी येथील ३३९ हेक्टर,  कुंभारवळणमधील ३५१  हेक्टर, उदाचीवाडी येथील २६१ हेक्टर, एखतपुर २७९ हेक्टर, मुंजवडी १४३ हेक्टर क्षेत्र महाराष्ट्र विकास विमानतळ कंपनीकडून अधिसूचित करण्यात आले आहे .विमानतळासाठी दोन हजार हेक्टर  क्षेत्र लागणार असून उर्वरित ८३२ हेक्टर क्षेत्रावर विमानतळासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत .

पुरंदरच्या पूर्व भागातील पारगाव., खानवडी, कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी या प्रस्तावित गावात आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शासनाने या अगोदर विविध प्रकारचे चे सर्वे केले आहेत .तसेच परवानग्याही घेतल्या  आहेत.याबाबत जिप चे सदस्य व विमानतळ विरोधी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दत्ता झुरंगे यांनी गेली तीन वर्षांपासून या सात गावातील बाधित शेतकऱ्यांचे सोबत वेळोवेळी मोर्चे आंदोलने रास्ता रोको करून विरोध दर्शविला असल्याचे सांगितले. तसेच मुदतीत १५५७ खातेदारांनी हरकती नोंदविल्याचे सांगितले.———————

टॅग्स :PurandarपुरंदरAirportविमानतळNavalkishor Ramनवलकिशोर रामFarmerशेतकरीGovernmentसरकार