बाजार समितीत १५४ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:10 IST2021-05-20T04:10:51+5:302021-05-20T04:10:51+5:30

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात युवकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा यासाठी ...

154 people donated blood in the market committee | बाजार समितीत १५४ जणांनी केले रक्तदान

बाजार समितीत १५४ जणांनी केले रक्तदान

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात युवकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा यासाठी सभापती शंकर जांभळकर यांनी आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. तब्बल १५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या वेळी रक्तदान करणाऱ्या दात्याच्या अँटिबॉडी चाचणी मोफत करण्यात आली.

याप्रसंगी माजी सभापती प्रकाश पवार, माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, उपसभापती विकास शिवले, आबाराजे मांढरे, सुदीप गुंदेचा, अमर ढोकले, बबन ढोकले, सचिव अनिल ढोकले, अनिल ढमढेरे, नीलेश जगताप, सागर शितोळे, किरण ढोकले, नितीन ढोकले, महेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: 154 people donated blood in the market committee