चक्रीवादळात घरांचे नुकसान झालेल्या आदिवासींना प्रत्येकी १५ हजार अर्थसाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST2021-06-21T04:08:05+5:302021-06-21T04:08:05+5:30
भीमाशंकर अभयारण्य परिसरातील भोरगिरी आणि भिवेगावला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. या तोक्ते वादळात भोरगिरी गावातील १११ पैकी ८२ ...

चक्रीवादळात घरांचे नुकसान झालेल्या आदिवासींना प्रत्येकी १५ हजार अर्थसाह्य
भीमाशंकर अभयारण्य परिसरातील भोरगिरी आणि भिवेगावला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. या तोक्ते वादळात भोरगिरी गावातील १११ पैकी ८२ आदिवासी आदिवासी बांधवांच्या जवळपास घरांचे छपरे, कौले, पत्रे उडून नुकसान झाले, तर भिवेगावात प्राथमिक शाळा इमारतीसह चार घरांचे नुकसान झाले होते.
घोडेगाव आदिवासी प्रकल्पाच्या वतीने या परिसराची पहाणी प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी केली होती. महसूल विभागाने केलेल्या नुकसान पंचनाम्यानुसार ही आर्थिक मदत देण्यात आली असून ७७ नुकसानग्रस्तांच्या नावे पंधरा हजार रुपये प्रत्येकी रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरितांना धनादेश देण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांनी आपण दिलेल्या बँकेच्या खात्यावर पंधरा हजार जमा झाले का, याची बँकेत जाऊन खात्री करावी असे आवाहन प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी केले आहे.