दगावलेल्या जनावरांच्या पशुपालकाला १५ हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:10 IST2021-09-26T04:10:44+5:302021-09-26T04:10:44+5:30
डाळज नंबर ३ गावचे पशुपालक गणेश जगताप यांच्या १६ गाई, लालासो गलांडे यांच्या सहा, गजानन जगताप यांच्या चार, तर ...

दगावलेल्या जनावरांच्या पशुपालकाला १५ हजारांची मदत
डाळज नंबर ३ गावचे पशुपालक गणेश जगताप यांच्या १६ गाई, लालासो गलांडे यांच्या सहा, गजानन जगताप यांच्या चार, तर किरण जगताप यांच्या दोन गाई लाळखुरकत रोगाने दगावल्या. या रोगाचा संसर्ग पसरू लागल्याने बाबूराव वायकर यांच्यासह भिगवण-शेटफळ गटाचे जि. प. सदस्य हनुमंत बंडगर यांनी डाळज येथील पशुपालकांची भेट घेत गोठ्यांची पाहणी केली. बाबूराव वायकर यांनी पशुपालकांच्या समस्या जाणून घेत जनावरांची प्रत्यक्ष पाहणी करत पशुपालकांना धीर देत येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पशुसंवर्धनच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी यवतचे जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, धनाजी थोरात, डाळजचे पशुवैद्यकीय अधिकारी संजय पराडे, डॉ. अभिजित आटोळे, डॉ. संतोष भारती, दादासाहेब गलांडे, संतोष शिंदे, खंडेराव जगताप, दिनेश मिटे, सूर्यकांत जगताप, आदी उपस्थित होते.
२५डाळज