शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील दीड लाख शिधापत्रिका अपात्र : अन्न धान्य वितरण कार्यालयाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 11:43 IST

खऱ्या लाभार्थ्यांना रास्त दर धान्य दुकानातील सुविधेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने ई प्रणाली लागू केली आहे.

ठळक मुद्दे दरमहा साडेअकरा कोटी रुपयांची होतेय बचत राज्य सरकारने शिधापत्रिकेला आधार जोडणी केली बंधनकारक केरोसीनचा वापर शून्यावर आणण्यात यश आल्याने, शहर केरोसीनमुक्त

पुणे : अन्न धान्य वितरण कार्यालयाने (एफडीओ) शहरात राबविलेल्या शोध मोहिमेत शहरातील १ लाख ६७ हजार ५१ शिधापत्रिका अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे ४ हजार ३९२ टन धान्याची बचत होत आहे. त्यामुळे अनुदानापोटी सरकारच्या तिजोरीवर दरमहा पडत असलेला भार, ११ कोटी ५० लाख ६९ हजार रुपयांनी कमी झाला असल्याची माहिती शहर अन्न धान्य वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.  खऱ्या लाभार्थ्यांना रास्त दर धान्य दुकानातील सुविधेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने ई प्रणाली लागू केली आहे. ई पॉस यंत्राद्वारे शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरीत करण्यात येत आहे. शहरात एक लाख रुपयांच्या आतील उत्पन्न असणाऱ्या आणि प्राधान्यक्रमाचा शिक्का असलेल्या शिधापत्रिका धारकांची संख्या ४ लाख १२ हजार ३७५ इतकी होती. त्यावर २० लाख ३० हजार ६७६ सदस्यांची नोंद होती. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या १५ हजार ५९ असून, त्यावरील सदस्यांची संख्या ७४ हजार ४१५ होती. या वेळी ऑनलाईन प्रणाली नव्हती. त्यावेळी गहू आणि तांदळाची दरमहा उचल ९ हजार ८९२ टन इतकी होती. राज्य सरकारने शिधापत्रिकेला आधार जोडणी बंधनकारक केली. डिसेंबर २०१५ नंतर अंदाजे २ हजार टन धान्याची मागणी कमी झाली. पुढील टप्प्यात ई पॉस यंत्राद्वारे शिधापत्रिकाधारकांना बायोमेट्रीक पद्धतीने (हाताचे ठसे) धान्य वितरणास सुरुवात झाली. मे २०१७ पासून या योजनेची सुरुवात करण्यात आली. तर, जुलै २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत टप्प्या टप्प्याने शहरातील सर्वच परिमंडळ कार्यालयात हीच प्रणाली अवलंबण्यात आली. या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणावर शिधापत्रिका अपात्र ठरल्या. रास्त धान्य दुकानाच्या माध्यमातून २ रुपये किलो दराने गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदळाचे वितरण करण्यात येते. सध्या खुल्या बाजारात गव्हाचा दर २४ रुपये आणि तांदळाचा दर ३२ रुपये प्रतिकिलो आहे. अपात्र शिधापत्रिकाधारक कमी झाल्याने त्या प्रमाणात सरकारी तिजोरीवरील भार देखील कमी झाली आहे. ------------------------- केरोसीनमुक्त शहरशहरामध्ये स्वयंपाकाचे इंधन म्हणून केरोसीनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. ऑगस्ट २०१५मध्ये १ हजार ८८४ किलोलिटर (१ किलो लिटर म्हणजे १ हजारलिटर) केरोसीनची उचल होत होती. त्यासाठी सरकार सुमारे ४० रुपये प्रतीलिटर प्रमाणे दरमहा ७ कोटी ५३ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान देत होते. केरोसीनचा वापर शून्यावर आणण्यात यश आल्याने, शहर केरोसीनमुक्त झाले आहे. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकार