भोर मधील वीज कामांसाठी १५ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST2021-05-14T04:11:52+5:302021-05-14T04:11:52+5:30
भोर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना आताचा होणार विद्युतपुरवठा हा कामथडी ऊपकेंद्रातुन होत होता. तो कमी प्रमाणात व कमी दाबाने ...

भोर मधील वीज कामांसाठी १५ कोटी मंजूर
भोर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना आताचा होणार विद्युतपुरवठा हा कामथडी ऊपकेंद्रातुन होत होता. तो कमी प्रमाणात व कमी दाबाने होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागायचे. त्यासाठी न्हावी ३२२ या ठिकाणी नवीन विद्युत उपकेंद्रासाठी ५ कोटी ४ लक्ष रुपये भाटघर येथील उपकेंद्रातील यंत्रसामग्री जुनी झाली असल्याने विद्युतपुरवठा वारंवार खंडित व्हायचा म्हणून त्या ठिकाणी नवीन यंत्रसामुग्रीसाठी ९ कोटी रुपये
शेती पंपाची वीज जोडणीची शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता नवीन वीज पंप, नवीन विद्युत खांब, जुने खांब दुरुस्ती, नवीन ट्रान्सफॉर्मर यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तालुक्यातील गंजलेले खांब बदलणे व विद्युत वाहिन्यांची काम करण्यासाठी अशा अनेक विद्युतविषयक कामासाठी ७५ लक्ष निधी मंजूर असून प्रशासकीय मंजुरीदेखील मिळालेली आहे. यामध्ये घरगुती वीज जोडणी पाणीपुरवठा योजना वीज जोडणी, दलितवस्ती वीज जोडणी आदी कामे केली जाणार आहेत. भोर शहरातील वीज वाहिनी अंडरग्राउंड करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपये निधीची योजना सादर करण्यात आली आहे. उभा कामाला देखील लवकरच मंजुरी मिळेल भोर तालुक्यातील लव्हेरी येथील कोविड सेंटर या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याविषयी सूचना करण्यात आली आहे.
अशा अनेक प्रकारच्या विद्युतविषयक विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची तरतूद आमदार संग्राम थोपटे यांच्या सततच्या पाठपुराव्याने मंजूर झालेली आहेत. लवकरच या कामांना सुरुवात देखील होईल.