शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील खड्ड्यांसाठी पालिकेकडून तब्बल १५ कोटी; आठवड्याभरात ८०० पेक्षा अधिक खड्डे बुजविल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 20:43 IST

शहरात एकूण चौदाशे किलोमीटरचे रस्ते असून यातील एक हजार किलोमीटरच्या डांबरी रस्त्यांवर खड्डे

ठळक मुद्देगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खड्डयांचे प्रमाण कमी असल्याचे पथ विभागाचे म्हणणे आहेप्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला एक कोटी

पुणे : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने रस्त्यांवर खड्डेच पडले नव्हते. परंतु, मागील आठवडाभरापासून लागलेल्या पावसाने रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्याभरात पालिकेने जवळपास ८०० पेक्षा अधिक खड्डे बुजविले असून खड्डे बुजविण्याकरिता १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर १५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांसाठी १५ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. शहरात एकूण चौदाशे किलोमीटरचे रस्ते असून यातील एक हजार किलोमीटरच्या डांबरी रस्त्यांवर खड्डे पडत असल्याचे दिसते आहे. बहुतांश भागात खड्डे आणि रस्त्यांची बिकट अवस्था होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहनचालकांना यंदाही कसरत करतच वाहने चालवावी लागत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खड्डयांचे प्रमाण कमी असल्याचे पथ विभागाचे म्हणणे आहे. रस्त्यांच्या कामांच्या सुमार दर्जामुळे वारंवार रस्ते उखडणे, खड्डे पडणे आदी कामांकरिता वारंवार खर्च करावा लागत आहे. यासोबतच रस्त्याचे काम झाल्यानंतर ड्रेनेज, जलवाहिनी, विद्युतवाहिनी अथवा एमएनजीएलच्या गॅसवाहिनीसाठी रस्ता पुन्हा खोदावा लागतो. कामाचा दर्जा तपासण्यासोबतच हे काम वेळेत पूर्ण होईल हे पाहण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पार पाडली जाणे अपेक्षित आहे. रस्त्यांची दुरुस्ती, रिसर्फेसिंग, खड्डे बुजविणे आदी कामांकरिता पालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांकरिता १५ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी १ कोटी रुपये देण्यात आले आहेत. पावसाळ्यात बुजविलेले खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. त्यातील मालही वाहून जाऊ लागला आहे. पालिकेने वापरलेल्या केमिकलची 'कमाल' पावसाच्या तडाख्यात उघडी पडली आहे. पालिकेच्या पथ विभागासह प्रकल्प विभाग, वाहतूक विभाग, स्थानिक क्षेत्रिय कार्यालयांकडून रस्त्यांसह उड्डाणपूल, पुलांखालील रस्त्यांवर रिसरफेसिंग, रस्ते दुरुस्ती, पॅच वर्क, खड्डे दुरुस्तीची कामे सुरू आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका