पुरंदरमध्ये १४६ कोरोनाबाधित : ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:11 IST2021-05-15T04:11:05+5:302021-05-15T04:11:05+5:30
सासवड येथील शासकीय लॅबमध्ये १३१ संशयित रुग्णांची अँटिजन चाचणी तपासण्यात आली. यापैकी ३८ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. सासवड ...

पुरंदरमध्ये १४६ कोरोनाबाधित : ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू
सासवड येथील शासकीय लॅबमध्ये १३१ संशयित रुग्णांची अँटिजन चाचणी तपासण्यात आली. यापैकी ३८ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. सासवड येथील १९, वाघापूर ३, एखतपूर, वीर, चांबळी प्रत्येकी २, भिवडी, हिवरे, झेंडेवाडी, नारायणपूर, माळशिरस, पारगाव, भिवरी, खळद, बांदलवाडी, कोडीत येथील प्रत्येकी १ रुग्णांचा कोरोना अहवाल बाधित आला आहे.
ग्रामीण कार्यक्षेत्रातील ‘माझे कुटुंब माझी जबाबदार मोहिमेअंतर्गत’ परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्रात २७ संशयित रुग्णांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यापैकी २० रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. कांबळवाडी ७, कोडीत बु. ४, वीर ४, टोणपेवाडी, हरणी २, परिंचे १.
सासवड येथील शासकीय लॅबमध्ये बुधवार (दि. १२) १० संशयित रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. याचे प्रलंबित अहवाल शुक्रवार (दि. १४) प्राप्त झाले असून, यापैकी २ बाधित आले. पिसर्वे, सुपा येथील प्रत्येकी एका रुग्णांचा कोरोना अहवाल बाधित आला आहेत.
सासवडच्या ग्रामीण रुग्णालयातील शासकीय लॅबमध्ये बुधवार (दि. १२) ३७ संशयित रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. यांचे प्रलंबित अहवाल शुक्रवार (दि.१४) प्राप्त झाले असून, १४ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. सासवड ७, देवडी, काळेवाडी २, शिवरी, वीर, गुरुळी येथील प्रत्येकी १ रुग्णांचा कोरोना अहवाल बाधित आला आहे.