शिरूरमध्ये २५ जणांकडून १४ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:09 IST2021-04-13T04:09:58+5:302021-04-13T04:09:58+5:30

शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे म्हणाले की, पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रांजणगाव गणपती पोलीस स्टेशनचे ...

14,000 fine from 25 in Shirur | शिरूरमध्ये २५ जणांकडून १४ हजारांचा दंड

शिरूरमध्ये २५ जणांकडून १४ हजारांचा दंड

शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे म्हणाले की, पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रांजणगाव गणपती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश राऊत म्हणाले की, आस्थापना कार्यालय, दुकाने पूर्णपणे बंद ठेवत जनतेने सहकार्य केले येथे विनामास्क हिंडणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात विनामास्क लोकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर शिक्रापूर येथे १३ विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून दोन हजार सहाशे रुपये दंड वसूल करण्यात आला.

---

कोरोनोचे संकट मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत शिरूर शहरासह टाकळी हाजी, न्हावरे, मांडवगण फराटा हा भाग येतो मात्र तुलनेने पोलीस बळ कमी असून या काळात राज्य राखीव पोलीस दलांच्या तुकड्या मदतीला दिल्यास मोकाट सुटणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. त्यासाठी जादा कुमक देण्यात यावी.

पोपटराव गावडे, माजी आमदार

Web Title: 14,000 fine from 25 in Shirur