१४ वर्षांची मुलगी ८ आठवड्यांची गर्भवती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:49+5:302021-04-11T04:11:49+5:30
पुणे : सोशल मीडियावरील ओळखीतून परस्पराविरुद्धच्या आकर्षणातून एक १४ वर्षांचे १९ वर्षांच्या युवकाबरोबर शारीरिक संबंध निर्माण झाले. या मुलीला ...

१४ वर्षांची मुलगी ८ आठवड्यांची गर्भवती
पुणे : सोशल मीडियावरील ओळखीतून परस्पराविरुद्धच्या आकर्षणातून एक १४ वर्षांचे १९ वर्षांच्या युवकाबरोबर शारीरिक संबंध निर्माण झाले. या मुलीला त्रास होऊ लागल्याने आईने तिला डॉक्टरांकडे नेले असता ती ८ आठवड्याची गर्भवती असल्याचे आढळून आले आहे.
त्यानंतर या मुलीच्या फिर्यादीवरुन भारती विद्यापीठ पोलिसांनी मंगळवार पेठेतील एका १९ वर्षांच्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ऑक्टोबर २०२० पासून ते ३० मार्च दरम्यान घडली. या युवकाची इन्स्टाग्रामवर या मुलीशी ओळख झाली. त्यातून त्यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले. तेव्हा या युवकाने मुलीला कात्रज येथील इंद्रप्रस्थ लॉजवर नेऊन तिच्यावर वांरवार अत्याचार केला. दोन दिवसांपूर्वी या मुलीला मळमळणे, उलट्यांचा त्रास होऊ लागला. तेव्हा तिच्या आईने भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तेथे डॉक्टरांनी तपासल्यावर ती ८ आठवड्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले.