शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

मासवडीच्या जेवणातून १४ जणांना विषबाधा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 20:05 IST

मुलीला मासवड्या खूप आवडतात. ती गावाला आल्यामुळे घरातील माणसांसाठी व नातेवाईकांसाठी मासवड्यांचा बेत आखण्यात आला.

ठळक मुद्देउपचार सुरु : सर्वांची प्रकृती स्थिर बेसनपीठ,मासवडीचा नमुना , शेंगदाणे यांचे नमुने लॅबमध्ये तपासण्यासाठी पाठविले जाणार

मंचर : आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे मासवडीच्या जेवणातून १४ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा झालेल्यांपैकी ९ जणांवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मुलीने मासवडी पुणे येथे मैत्रिणींना डब्यातून नेल्या होत्या. त्या खाल्ल्यानंतर पुण्यातील ५ जणींना विषबाधा झाल्याने त्यांच्यावर पुणे येथे उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याची माहिती उपचार करणाºया डॉक्टरांनी दिली. जारकरवाडी(ता. आंबेगाव) गावातील भोजणेमळा येथे राहणारे संजय दत्तात्रय भोजणे यांची मुलगी पुणे येथे शिक्षण घेते. महर्षी कर्वे विद्यालयात ती १२ वी च्या वर्गात शिकते. मुलीला मासवड्या खूप आवडतात. ती गावाला आल्यामुळे घरातील माणसांसाठी व नातेवाईकांसाठी मासवड्यांचा बेत आखण्यात आला. मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून जेवणाला सुरुवात झाली. त्या दिवशी अंगारकी चतुर्थी असल्याने अनेकांनी चंद्रोदय झाल्यानंतर मासवड्या खावून उपवास सोडला. दरम्यान मुलीने मैत्रिणींसाठी डबा भरुन मासवड्या पुणे येथे नेल्या. मैत्रिणींनीही या मासवड्या खाल्ल्या.बुधवारी सकाळी मासवड्या खाल्लेल्यांना त्रास जाणवू लागला. थंडी, ताप, जुलाब, उलट्या, डोके गरगरु लागल्याने त्यांनी स्थानिक डॉक्टरकडे उपचारासाठी धाव घेतली. हा विषबाधेचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांना उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात रमेश पांडूरंग लबडे (वय-६०), नितीन रमेश लबडे (वय २२), विष्णु लक्ष्मण लबडे (वय-६७), सत्यभामा विष्णु लबडे (वय ६२), शंकर विष्णु लबडे (वय-३५), अर्चना रोहिदास लबडे (वय-२६), साक्षी संजय भोजणे (वय -१६), चैताली संजय भोजने (वय-१२) सर्व रा. जारकरवाडी यांच्यावर उपचार सुरु आहेत. संजय भोजणे यांना त्रास झाला होता मात्र सकाळच्या उपचारानंतर ते बरे झाले आहेत. त्यांची मुलगी व तिच्या मैत्रीणी यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. मुलगी घरी येण्यास निघाली असल्याची माहिती संजय भोजणे यांनी दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश गुडे व डॉ. सतिश धमणे यांनी विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार केले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉ. महेश गुडे यांनी दिली. दरम्यान मासवडी बनविण्यासाठी वापरलेले बेसनपीठ,तसेच मासवडीचा नमूूना , शेंगदाणे यांचे नमुने लॅबमध्ये तपासण्यासाठी पाठविले जाणार आहेत.त्याचा रिपोर्ट आल्यानंतर विषबाधेचे कारण समजु शकणार आहे. 

टॅग्स :MancharमंचरStudentविद्यार्थी