पर्यटन कंपनीकडून १४ लाखांंचा गंडा

By Admin | Updated: March 22, 2017 03:33 IST2017-03-22T03:33:45+5:302017-03-22T03:33:45+5:30

परदेश सहलीच्या पॅकेजनुसार सुविधा न देता पर्यटकांची; तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे एका कंपनीची एकूण १३ लाख ८९ हजार रुपयांची

14 lakhs from the tourism company | पर्यटन कंपनीकडून १४ लाखांंचा गंडा

पर्यटन कंपनीकडून १४ लाखांंचा गंडा

पुणे : परदेश सहलीच्या पॅकेजनुसार सुविधा न देता पर्यटकांची; तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे एका कंपनीची एकूण १३ लाख ८९ हजार रुपयांची पर्यटन कंपनीने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
नरोत्तम चव्हाण (वय ७३, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी येथील के. के. मार्केट येथे बालाजी हॉलिडे ही पर्यटन कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून फिर्यादीसह ३७ पर्यटक दुबई येथे गेले. या सहलीसाठी पॅकेज ठरविण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येकाकडून १० हजार रुपये डिपॉझिट घेतले. मात्र, पॅकेजनुसार पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळे दाखविली नाहीत. तसेच तेथे दुपारचे आणि रात्रीचे जेवणही दिले नाही. याबाबत कंपनीने पर्यटकांना उडवाउडवीची उत्तरे देत ३७ जणांची एकूण ७ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली.
त्याचप्रमाणे महिला मेघना गोडे यांना एक्स्प्रेस व्हिसा काढून देतो, असे सांगत त्यांच्याकडून १२ हजार ५०० रुपये घेतले. तसेच मधुकर हरिभक्त यांच्याकडून सहलीसाठी एक लाख ३० हजार रुपये घेतले होते. मात्र, त्यांना सहलीला न नेता त्यांचे पैसेही परत देण्यास कंपनीने नकार दिला. यानंतर आर. आर. सेन अँड ब्रदर्स लि. कंपनीचे ब्रँच मॅनेजर अभिजित खरे यांना अनुप्रती साळुंखे, भय्यालाल गुरबक्ष देलवन आणि मीरा ससाने यांची मूळ कागदपत्रे देत त्यांनी स्वत: बालाजी हॉलिडेज कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासविले. त्यांना खोटी आरटीजीएस स्लीप मेल केली आणि आर. आर. सेन अँड ब्रदर्स लि. कंपनीची तब्बल ४ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केली. (प्रतिनिधी)

Web Title: 14 lakhs from the tourism company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.