उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत १४ दिवस कडक 'जनता कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 08:07 PM2020-09-04T20:07:22+5:302020-09-04T20:31:31+5:30

बारामती शहराच्या सीमा चारही बाजुने होणार ‘सील’

14 days strict curfew in Baramati city and taluka | उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत १४ दिवस कडक 'जनता कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत १४ दिवस कडक 'जनता कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

googlenewsNext

बारामती : बारामती शहर तालुक्यात गेल्या तीन दिवसात कोरोना रुग्णांनी त्रिशतक पार केले. सलग तीन दिवस कोरोना रुग्णांचा आलेख चढता राहिल्याने प्रशासन हादरले.अखेर प्रशासनाने कडक निर्बंध लागु करीत १४ दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. यामध्ये मेडिकल,दूध वगळता सर्व सेवा,व्यवसाय बंद राहणार आहेत. बारामती शहराच्या सीमा चारही बाजुने ‘सील’ करण्यात येणार आहे.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर,  पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्यधिकारी किरणराज यादव यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार बारामती तालुका व शहर दि ७ सप्टेंबर ते २१ पर्यंत जनता कर्फ्यु राहणार आहे.

शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहर कडक लॉकडाऊन असणार आहे. याबाबत आज नगराध्यक्ष  तावरे यांनी पत्रकारांच्या बैठकीत सांगितले की, शहरातील मागील चार दिवसातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० टक्के एवढी आहे.त्यामुळे वैद्यकीय सेवा ढासळू नये यासाठी चौदा दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे.
 पुढील चौदा दिवस कोणालाही अत्यावश्यक सेवा वगळता घरातून बाहेर पडता येणार नाही.तसेच शहरातून बाहेर किंवा बाहेरील कोणालाही शहरात येता येणार नाही.

तालुक्यातील कोरोना संसर्गाने  बळी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.शहरातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.जनता कर्फ्युसाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या. शहरातील खासगी डॉक्टरांनी कोविडच्या कामात हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला.
 

कोरोनाचे रुग्ण असणाऱ्या भागात जनता कर्फ्यू राहणार आहे. तर
तालुक्याबाहेरील कोणालाही शहरात येता येणार नाही प्रत्येक गावातील
लोकांनी अत्यावश्यक सेवा वगळता आपल्या गावाची सीमा बंद करायची आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे व्यवसाय, हातगाडी, अन्य विक्रेते सुरू राहणार नाहीत. यामुळे देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या संदर्भात माहिती साठी डॉ.मनोज खोमणे तर शहरातील नागरिकांनी डॉ. सदानंद काळे व डॉ. पंकज गांधी यांच्याशी व्हाट्सए वर संपर्क साधावा.तसेच आपल्या जवळील खासगी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,असे आवाहन तावरे यांनी केले. आता कोरोना संसर्गाची तपासणी केल्यानंंतर संबंधितांना त्याच थांबविण्यात येणार आहे.त्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याला तेथून थेट रुग्णालयात नेणार आहेत.त्यामुळे त्याच्या घरच्या किंवा आसपासच्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तर या रुग्णांवर चौदा दिवस रुग्णांवर योग्य इलाज झाल्यास कोरोना संसर्ग आटोक्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

......
बारामती एमआयडीसीत कंपन्या सुरुच राहणार
  बारामती शहर आणि तालुक्यात जनता कर्फ्यु जाहिर करण्यात आला आहे.या दरम्यान शहर  आणि तालुक्याच्या सर्व सीमा सील राहणार आहेत.मात्र,एमआयडीसीतील कंपन्या ,उद्योग नियम व अटींनुसार सुरुच राहणार आहेत. कंपन्यांमधील कामगारांना त्यांचे ओळखपत्र दाखवुन सोडले जाणार आहे,अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
————————————————————————————————

Web Title: 14 days strict curfew in Baramati city and taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.