वर्ल्डवाइड आॅइलफिल्ड्सकडून १४ कोटी रुपये जप्त
By Admin | Updated: March 22, 2017 03:37 IST2017-03-22T03:37:39+5:302017-03-22T03:37:39+5:30
पुण्यातील वर्ल्डवाइड आॅइलफिल्ड्स मशिन कंपनीचे संचालक आणि अन्य व्यक्तींकडून सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी

वर्ल्डवाइड आॅइलफिल्ड्सकडून १४ कोटी रुपये जप्त
पुणे : पुण्यातील वर्ल्डवाइड आॅइलफिल्ड्स मशिन कंपनीचे संचालक आणि अन्य व्यक्तींकडून सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी १४.६९ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. नोटाबंदीच्या काळात प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉँडरिंग अॅक्टनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यापैकी १० कोटी रुपयांची रक्कम बँक आॅफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेतील लॉकरमधून जप्त करण्यात आली होती.
वर्ल्डवाइड आॅइलफिल्ड मशिन कंपनीचे संचालक सुधीर पुराणिक, सीएफओ मंगेश अन्नछत्रे यांनी ईशान्य मोटर्सचे सत्येन गठाणी व त्यांच्या साथीदारांच्या मदतीने बाद नोटा वैध चलनात बदलून घेतल्या त्यासाठी संबंधितांना मोठी रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती, हे सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या चौकशीत समोर आले़
त्यानंतर त्यांनी एकूण १४़६९ कोटी रुपये जप्त केले आहेत़ केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्ल्डवाइड आॅइलफिल्ड मशिन कंपनीचे संचालक सुधीर पुराणिक, सीएफओ मंगेश अन्नछत्रे आणि ईशान्य मोटर्सचे सत्येन गठाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)