‘जीएसटी’पोटी पालिकेला १३१ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:46 IST2018-05-07T03:46:38+5:302018-05-07T03:46:38+5:30
राज्यातील २६ महापालिकांना राज्य सरकारने वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) १ हजार ४३६ कोटी १६ लाख रुपयांचे वितरण केले आहे. हे अनुदान मे महिन्यासाठीचे आहे. त्यात पुणे महापालिकेला १३१ कोटी ६ लाख, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेला १२५ कोटी ५७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

‘जीएसटी’पोटी पालिकेला १३१ कोटी
पुणे : राज्यातील २६ महापालिकांना राज्य सरकारने वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) १ हजार ४३६ कोटी १६ लाख रुपयांचे वितरण केले आहे. हे अनुदान मे महिन्यासाठीचे आहे. त्यात पुणे महापालिकेला १३१ कोटी ६ लाख, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेला १२५ कोटी ५७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
राज्य सरकार दरमहा राज्यातील महापालिकांना त्यांच्या क्षेत्रातून वसूल केल्या जाणाऱ्या जीएसटी करापोटी अनुदान देत असते. एक देश, एक कर लागू केल्यामुळे महापालिकांच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत असलेल्या जकातीवर बंदी आली. केंद्र सरकारचाच आदेश असल्यामुळे; तसेच कायद्यातच तसा बदल केल्यामुळे महापालिकांसमोर त्यांचे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता; मात्र सरकारने महापालिकांना नुकसानभरपाई दरमहा देण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे महापालिकांना दरमहा अनुदान देण्यात येत असते. मे महिन्यासाठीचे अनुदान १३१ कोटी ६ लाखांचे, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे १२५ कोटी आहे. अन्य २४ पालिकांनाही अनुदान वितरित केले असून, सर्वाधिक म्हणजे ६९९ कोटी १३ लाख रुपयांचे अनुदान बृहन्मुंबई महापालिकेला मिळाले आहे. सर्वांत कमी १ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान लातूर महापालिकेला मिळाले आहे.